शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 16:15 IST

गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. 

ठळक मुद्देहाताची घडी. तोंडावर बोटवर गुन्हा दाखल करण्याची मागणीमजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे गैरप्रकार

पुणे :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची सोमवारी सकाळी भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली. राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह स्वत: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली जात आहे. राजकीय विरोधातून टीका करण्यास काहीही हरकत नाही; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्द वापरले जात आहेत. मजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे प्रकार केले जात आहेत. फेसबुकवर हाताची घडी, तोंडावर बोट नावाचे एक पेज आहे. या पेजवरून ही बदनामी केली जात आहे. त्यामुळे हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्याचे अ‍ॅडमिन जे कोणी असतील त्या सर्वांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आमच्या नेत्यांनी अथवा मी कधीही कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील जनतेमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. त्यासाठी फोटो मॉर्फ केले जात आहेत. या प्रकारामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षातील मान्यवर नेते आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांना याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडियाSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार