शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तळजाई  'ऑक्सिजन पार्क' च्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:24 IST

तळजाई टेकडीवरील उद्यानाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण

ठळक मुद्देरखडलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार पालिकेच्या २०१७ साली मंजूर झालेल्या विकास आराखड्यामध्ये उद्यानाचे आरक्षण

पुणे : तळजाई टेकडीवर १०८ एकरामध्ये साकारण्यात येणाऱ्या ‘ऑक्सिजन पार्क’चा मार्ग मोकळा झाला असून उर्वरीत जागेचे रखडलेले भूसंपादनही पूर्ण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये जागेच्या वादामधून सुरु असलेल्या खटल्यात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला आहे. पुण्याची फुफ्फुसे असलेल्या टेकड्यांपैकी महत्वाच्या तळजाई टेकडीवरील जागांच्या भूसंपादनाची प्रक्रिया २००३ साली सुरु झाली होती. शासनाने भूसंपादनासाठी 2005 साली निवाडा जाहिर केल्यानंतर जमीन मालकांना चार टक्के दराने मोबदलाही देण्यात आला. त्यासाठी पालिकेने २७ कोटी रुपये शासनाकडे जमा केले. काही जमीन मालकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पालिकेच्याविरुद्ध निकाल गेला. पालिकेने त्याला सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. पालिकेच्या २०१७ साली मंजूर झालेल्या विकास आराखड्यामध्ये उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले. परंतू, संगमवाडी, बिबवेवाडी आणि तळजाई टेकडीवरील जागेसंदर्भात निर्णय राखून ठेवण्यात आलेला होता. या जागेवर पालिका वन उद्यान विकसीत करीत आहे. दरम्यान, या जागेचे आरक्षण बदलून भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याचा आणि जमीन मालकांना जादा टीडीआर देण्याचा घाट काही लोक प्रतिनिधींद्वारे घालण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यातच राज्यातील सरकार बदलले. 

काही महिन्यांपुर्वी याठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतू, नगरसेवकांनी तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांनी जोरदार विरोध करीत हे काम बंद पाडले होते. उद्यानाच्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने काम रखडले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यामध्ये पालिकेच्या बाजूने निकाल लागला असून तळजाई टेकडीवरील उद्यानाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. =====

ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी मी नगरसेवक असताना भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केली होती. त्यामध्ये अनेक अडथळे आणण्यासोबतच अनेक आमिषेही दाखविण्यात आली. त्याला बळी न पडता पर्यावरणाचा विचार करुन प्रयत्न सुरु ठेवले. दरम्यान, जागा मालक अनेकदा न्यायालयात गेले. काही जागा मालक सर्वोच्च न्यायालयातही गेले. तेथेही सर्वोच्च न्यायालयात पालिकेच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे या उद्यानाचा मार्ग सुकर झाला असून पर्यावरण प्रेमी नागरिक, तळजाईवर फिरायला येणाºया नागरिकांचा हा विजय आहे. - सुभाष जगताप, नगरसेवक

टॅग्स :Taljai Tekdiतळजाई टेकडीreservationआरक्षणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय