शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: लाच स्वीकारल्याप्रकरणी जुन्नर कृषी विभागातील पर्यवेक्षकाला अटक, ACB ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:15 IST

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले...

जुन्नर (पुणे) : ट्रॅक्टरचे शासकीय मंजूर अनुदान मिळण्यासाठी चार हजार रुपयांच्या रकमेची लाच स्वीकारताना जुन्नर कृषी विभागातील पर्यवेक्षक बापू एकनाथ रोकडे (५७, रा. जुन्नर) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली.

या घटनेतील तक्रारदार शेतकरी यांना लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर करण्यात आला होता. यासाठीची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी केलेली होती. जुन्नर कृषी विभागाच्या कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक रोकडे यांनी ट्रॅक्टरचे मंजूर अनुदान मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

यातील चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रोकडे यांना तालुका कृषी कार्यालयातच सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करत आहेत. रोकडे यांच्यावरील कारवाईने जुन्नर तालुका कृषी कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे, तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना लाचप्रकरणी अटक झालेले रोकडे अडचणीत आले आहेत.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPuneपुणेJunnarजुन्नरCrime Newsगुन्हेगारी