सुपे नारोळीत १ बिनविरोध तर ६ जागेसाठी सरळ लढत एका माजी सदस्यांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:06+5:302021-01-13T04:27:06+5:30
येथील ७ जागांसाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैद्य ठरला. तर माघार घेण्याच्या अखेरच्या ...

सुपे नारोळीत १ बिनविरोध तर ६ जागेसाठी सरळ लढत एका माजी सदस्यांची प्रतिष्ठा पणाला
येथील ७ जागांसाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैद्य ठरला. तर माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी २ उमेदवारांनी माघार घेतल्याने १ जागा बिनविरोध झाली. तर ६ जागांसाठी १२ उमेदवार राहिल्याने सरळ लढत होत असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी विलास बंडगर यांनी दिली.
येथील तुकाईदेवी परिवर्तन पॅनल आणि जगदंबा प्रगती पॅनल या दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहे. तुकाईदेवी पॅनलच्या प्रभाग क्रमांक १ मधील एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये माजी सदस्यांची पत्नी तसेच माजी सदस्याची सुन नशीब आजमावित आहे.
........................................