सुनेत्रा पवार यांनी धरला फुगडीचा फेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:11+5:302021-09-06T04:15:11+5:30
उरुळी कांचन येथील मेमाणे फार्ममधील ‘माझे माहेर... माझी सासरवाडी’ या सांकृतिक खुल्या रंगमंचावर बारामती, दौंड, हवेली व मुळशी तालुक्यातील ...

सुनेत्रा पवार यांनी धरला फुगडीचा फेर
उरुळी कांचन येथील मेमाणे फार्ममधील ‘माझे माहेर... माझी सासरवाडी’ या सांकृतिक खुल्या रंगमंचावर बारामती, दौंड, हवेली व मुळशी तालुक्यातील महिलांनी एकत्र येत ‘मंगळागौर’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सुनेत्रा पवार यांनी महिला खेळत असलेल्या फुगड्यांच्या कार्यक्रमात फेर धरत सांस्कृतिक कार्यक्रमांच आस्वाद घेतला.
किशोर मेमाणे यांच्या मेमाणे फार्ममध्ये महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे व शुभांगी मेमाणे यांनी आणि सहकारी भगिनींनी महिलांना एकत्र करून घेतलेल्या कार्यक्रमात फुगडीचा फेर धरल्याने कार्यक्रमात सहभागी महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या कार्यक्रमात दौंड, हवेली व बारामती तालुक्यातील महिला सहभागी झाल्या होत्या. सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी दुपारी १२ वाजता हजर राहून शेवटपर्यंत त्याचा आनंद घेतला. कार्यक्रम जसा रंगत गेला तसा त्या उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महिलांना दाद देऊन त्यांनी उपस्थित सर्व महिलांची मने जिंकली.
फोटो ओळ : मंगळागौर कार्यक्रमात उपस्थित सुनेत्रा पवार.