शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रविवार पेठेत भरदुपारी दरोडा, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 22:08 IST

रविवार पेठेतील पायल गोल्ड या सोन्याच्या होलसेल सराफी दुकानात पाच चोरट्यांनी शिरून दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून ७०० ग्रॅम सोने व ३० हजार रुपये, दोन मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. 

पुणे : रविवार पेठेतील पायल गोल्ड या सोन्याच्या होलसेल सराफी दुकानात पाच चोरट्यांनी शिरून दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून ७०० ग्रॅम सोने व ३० हजार रुपये, दोन मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या दुकानाच्या शेजारील दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. दरोड्याचा हा प्रकार रविवार पेठेतील रेल्वे आरक्षण केंद्रासमोरील गल्लीतील नंदन टेरेस या इमारतीच्या तळमजल्यावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. गुन्ह्याचे स्वरुप पाहता चोरट्यांनी अगोदर रेकी करून हा दरोडा टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, पोलिसांना हा दरोडा टाकणा-यांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.या प्रकरणी मनोज जैन (वय ३६, रा. मार्केटयार्ड) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जैन यांचे भागीदारीत नंदन टेरेस या इमारतीच्या तळमजल्यावर पायल गोल्ड हे सराफी दुकान आहे. या दुकानाच्या शेजारील इमारतीत त्यांचे दागिने घडविण्याची रिफायनरी आहे. पायल गोल्ड हे छोटेसे दुकान असून त्यात होलसेल व्यापार चालतो. मुंबईहून सोने आणून सराफ दुकानदार, सुवर्णकार यांना ते विकतात. बुधवारी दुपारी सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास मनोज जैन हे दुकानात एकटेच होते. त्यावेळी साधारण २५ ते ३० वयाच्या चौघा जणांनी चालत चालत येऊन इमारतीत प्रवेश केला. त्यांनी दुकानात प्रवेश करून त्यांच्यातील एकाने आपल्या कमरेला लावलेले दोन कोयते काढले. त्यातील एक दुस-याकडे दिला. त्यावेळी बाहेरून एकाने शटर ओढून घेतले. एक जण कोयता उगारून जैन यांच्यासमोर उभा राहिला. दुस-याने काऊंटरच्या कडेने आत येऊन डॉव्हरमधील सोन्याची बिस्किटे व रोकड बाहेर काढली़ तिस-याकडे असलेल्या बॅगेत ही ऐवज भरला आणि ते काही मिनिटातच पुन्हा शटर उघडून निघून गेले. घाईघाईत जाताना त्यांनी रुमाल व कोयते तेथेच टाकून पळ काढला. बाहेर ते पळत पळत आले. त्यांच्या पाठोपाठ मनोज जैन हे आले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने कोयता फेकून मारला व तो त्यांनी तो चुकविला. आले तसे गल्लीतून बाहेर पडून दोन दिशांना ते दोघे पळून गेले.या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. जी. अंबुरे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वान पथकाने चोरट्यांनी तेथेच टाकलेल्या रुमालावरून काही अंतरापर्यंत त्यांचा माग काढला. त्या ठिकाणाहून ते वाहनात बसून पळून गेले असावेत, असा अंदाज आहे.नंदन टेरेट ही इमारत अतिशय आतल्या बाजूला असून बाहेरून तेथे असा काही व्यवसाय सुरू असेल, याची इतरांना कल्पना सुद्धा येणार नाही. त्यामुळे चोरट्यांनी रेकी करून त्यानंतर हा दरोडा टाकला असल्याचा संशय आहे. पायल गोल्ड हे दुकान छोट्याशा गाळ्यामध्ये आहे. या दुकानाच्या बाहेरच पाण्याचा नळ आहे. त्या ठिकाणी अनेक कामगारांची हात धुण्यासाठी येजा असते. त्यामुळे तेथे येणा-यांकडे इतरांचे लक्ष जाऊ शकत नाही. चोरट्यांनी आत शिरताच बाहेरच्याने शटर खाली ओढून बंद करून घेतल्याने इतरांना आत काय प्रकार चालू आहे, याची काहीही कल्पना आली नाही. शेजारच्या दुकानातील कामगार त्यावेळी टीव्हीवर बातम्या पाहत असल्याने त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असले तरी त्यांना त्याची कल्पना आली नाही. सीसीटीव्हीवर मिळालेल्या छायाचित्रांवरून पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेRobberyदरोडा