शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘सनबर्न’ने परवानगी घेताना केली दिशाभूल; मुळशीतील लवळे ग्रामसभेत ना हरकत प्रमाणपत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:35 IST

पुणे जिल्ह्यामध्ये गाजत असलेले व सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला ‘सनबर्न’ या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून चांगल्याच प्रकारे विरोध सुरू झालेला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमस्थळी भेट देऊन सर्व कामे पाडली बंद ग्रामपंचायतीच्या वतीने रोटमलनाथ मंदिरामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन

पिरंगुट : सध्य परिस्थितीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गाजत असलेले व सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला ‘सनबर्न’ या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून चांगल्याच प्रकारे विरोध सुरू झालेला आहे. बावधन, हिंजवडी पाठोपाठ आता लवळे गावचे ग्रामस्थ ही एकवटले आहेत.लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामसभा घेतली होती. त्यामध्ये सनबर्गच्या आयोजकांनी लवळे ग्रामपंचायतीची दिशाभूल करून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले होते. परंतु ते ना हरकत पत्र आम्ही रद्द केलेले आहे, अशी माहिती लवळे गावच्या सरपंच विद्या क्षीरसागर यांनी दिली. पण कंपनीने जरी बळजबरीने हा कार्यक्रम घेतल्यास आत्मदहनाचा व आंदोलनाचा इशारा ही ग्रामस्थांच्या वतीने या ग्रामसभेमध्ये देण्यात आला. त्यानुसार या ग्रामसभेमध्ये ‘सनबर्न’ या कार्यक्रमाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमस्थळी भेट देऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या तयारीसाठी चालु असलेली सर्व कामे बंद पाडली.विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुणे शहराजवळ २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये मुळशी तालुक्यामधील लवळे व बावधन गावाच्या सीमेवर होत असल्याने कथित ‘सनबर्न’ या कार्यक्रमाच्या विरोधामध्ये लवळेचे संपूर्ण ग्रामस्थ एकवटले असून या कार्यक्रमाला लवळे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलेला आहे. यासाठी नुकतेच ग्रामपंचायतीच्या वतीने रोटमलनाथ मंदिरामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.लवळे (ता. मुळशी) येथील आॅक्सफोर्ड गोल्फ क्लब रिसॉर्ट येथे सनबर्ग हा कार्यक्रम होत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या शहरात विरोध झाल्याने बावधन व लवळे गावच्या सीमेवर हा कार्यक्रम होत आहे. यासाठी मुंबई येथील मे. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लवळे ग्रामपंचायतीकडे दिनांक ४ डिसेंबर २०१७ रोजी संगीतमय कार्यक्रम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ग्रामपंचायतीने मिळालेल्या अजार्नुसार संगीतमय कार्यक्रम आहे म्हणून ना हरकत प्रमाणपत्र दिलेमें. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ‘सनबर्न’ नावाचा कलंकित कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यास सर्व पुणे जिल्ह्यातून सर्व क्षेत्रातून विरोध आहे. लवळे ग्रामपंचायतीने हा कार्यक्रम होण्यासाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली होती. तसेच या कार्यक्रमास विरोध करण्यासाठी ग्रामसभा विशेष ग्रामसभा आयोजित करावी असा अर्ज ६ डिसेंबर २०१७ रोजी दिला होता. यासंदर्भात सरपंच विद्या क्षीरसागर व उपसरपंच वैभव कुदळे यांनी सांगितले, की में. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलेल्या अर्जात ‘सनबर्न’ कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. केवळ संगीतमय कार्यक्रमासाठी परवानगी पाहिजे, असे लिहले होते. त्यामुळे कंपनीने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याचे लक्षात आल्याने विशेष ग्रामसभा घेऊन दिलेले ना हरकत प्रमाणपत्र सवार्नुमते रद्द करण्यात आले आहे.

टॅग्स :pirangutपिरंगुटPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड