शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराने भारावले, मोठं होऊन यशस्वी अभिनेत्री व्हायचंय; 'सुमी' फेम आकांक्षा पिंगळेची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 22:10 IST

पुण्याच्या आकांक्षाला बालकलावंतांचा सन्मान...

- विश्वास मोरे

पिंपरी : पहिल्याच चित्रपटात सर्वोत्कृष्ट बालकलावंतांचा सन्मान मिळणे ही आनंददायी गोष्ट आहे. पुरस्काराने मी भारावले आहे, आयुष्यात मोठं होऊन यशस्वी अभिनेत्री व्हायचंय, अशी भावोत्कटता बालकलावंत आकांक्षा पिंगळेने शुक्रवारी व्यक्त केली.

राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा शुक्रवारी सायंकाळी झाली. त्यात सुमी या बालचित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुमी फेम आकांक्षा पिंगळे ही पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर येथे वास्तव्यास असून तिचे वडील लक्ष्मण पिंपळे हे एका कंपनीत नोकरीस आहेत तर आई गृहिणी आहे. मुलीला पुरस्कार मिळाल्याने पिंगळे कुटुंब हरखून गेले आहे.

शुक्रवारी सायंकाळी पुरस्काराची बातमी कळताच वल्लभनगरात आनंदोत्सव करण्यात आला आहे. तसेच माजी महापौर योगश बहल यांनी घरी जाऊन आकांशाचा सन्मान केला. सातवीनंतरच्या शिक्षणासाठी सुमीचा संघर्ष या चित्रपटातून दाखविला असून या चित्रपटाची निर्मिती हर्षल कामत यांनी केली आहे. तर दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केले आहे. तर आकांशाने सुमीची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कल्याणजवळील शहापूर येथे झाले आहे.

दोन मुलांच्या शिक्षणाच्या संघर्षाची कथा आहे. आकांक्षा आणि देवेश इंदूरकर यांनी उत्तम अभिनय केला आहे. त्या दोघांचे यश आहे. तसेच मला मार्गदर्शन करणाऱ्या अमोल गुप्ते यांनी मार्गदर्शन केल्याने यश मिळू शकले.-अमोल गोळे, दिग्दर्शक

माझ्या चित्रपटास पुरस्कार मिळाला. काय बोलावं कळत नाही. मला अभिनय करणे आवडते. आता शिक्षण सुरू आहे. भविष्यात यशस्वी अभिनेत्री व्हायचे आहे. कलेचे शिक्षण घ्यायचे आहे.-आकांशा पिंगळे, बालकलावंत

सुमी या चित्रपटास राष्ट्रीयपुरस्कार मिळाला. चित्रपटात उत्तम काम केल्याची पुरस्कार ही पावती आहे. मुलीने केलेल्या कष्टाचे चिज झाले. अभिनय हा तिचा आवडता छंद आहे. भविष्यात तिच्या कलागुणांना वाव देणार आहे.  -लक्ष्मण पिंगळे, वडील

 

टॅग्स :PuneपुणेPresidentराष्ट्राध्यक्षNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Maharashtraमहाराष्ट्र