शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

लोणी स्टेशन येथे हडपसरच्या वर्मा गँगमधील सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्टल व काडतुस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 13:15 IST

प्रतिक वाघमारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा तयारी, घरफोडी, विनयभंग व दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.

लोणी काळभोर : जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने हडपसरच्या सुजीत वर्मा गँगमधील एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांस जेरबंद केले आहे. त्याचेकडून एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात  आले आहे. 

             याप्रकरणी प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे ( वय २१, रा.शांतीसागर वसाहत, आकाशवाणी समोर, हडपसर पुणे ) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे याला कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून ५० हजार ३०० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. 

    मंगळवारी ( २० ऑक्टोबर ) रोजी गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, प्रमोद नवले यांचे पथक सायंकाळचे सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत त्यांना स्टेशन चौकातील मनोहर क्लॉथसमोर एक निळे काळे रंगाचा टी शर्ट घातलेला व्यक्ती कमरेला पिस्तुल लावून दहशत निर्माण करत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली. त्याप्रमाणे या पथकाने तात्काळ त्याठिकाणी जात सापळा रचून संशयितरित्या फिरत असलेल्या प्रतिक वाघमारे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून बेकायदेशीर एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकुण ५० हजार ३०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. व त्याला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले असून त्याच्यावर भारतीय कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. 

प्रतिक वाघमारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी हडपसर पोलीसठाण्याचे हद्दीत दरोडा तयारी, घरफोडी, विनयभंग व दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापूर्वी पुणे शहर व जिल्हयातून तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

   सुमारे पाच माहिन्यापूर्वी भेकराईनगर हडपसर येथे खून झालेला वर्मा गँगमधील सराईत मयत गुन्हेगार शोएब शेख हा यातील आरोपी प्रतिक वाघमारे याचा जवळचा जोडीदार होता. त्या अनुषंगानेही स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास चालू आहे. वाघमारे याने सदरचे गावठी पिस्तुल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे का ? याबाबतचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर हे करत आहेत

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक