शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

चासकमान धरणाचा परिसर पीपीपी तत्त्वावर पर्यटन क्षेत्रास योग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:28 IST

चासकमान धरण परिसरात डोंगरदऱ्या, घनदाट वनराई, उंच-उंच वृक्षांची लागलेली स्पर्धा, लाल मातीने जिवाभावाची नाती असं साधंसोपं वर्णन केलं जात आहे.

ठळक मुद्देविश्रामगृहाचा दर्जा सुधारण्यास मिळेल मदत : नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार

चासकमान : चासकमान धरणाचा परिसर म्हणजे काय?’ असं कुणी विचारलं, की एका झटक्यात सांगितलं जाई ‘जलाशय अन् पांढरेशुभ्र तुषार उडवीत सुंदर धबधबे, लाटा, उंच-उंच गर्द झाडीचे सौंदर्य, भौगोलिक, धार्मिक, कृषी, आनंद आणि निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू.’ यामुळे चासकमान धरण परिसर पर्यावरणपूरक पीपीपी तत्त्वावर पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी योग्य आहे.पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर, राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर अंतरावर, शिरूर-भीमाशंकर राज्य मार्ग क्रमांक ५४ वर निसर्गरम्य ठिकाणी चासकमान धरणाचा परिसर असल्याने एक-दोन दिवसांची सहल सहज करू शकतात. यामुळे धरण परिसरात पर्यटनक्षेत्र विकसित करण्याबरोबरच जलसंपदा खात्याच्या विश्रामगृहाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.चासकमान धरण परिसरात डोंगरदऱ्या, घनदाट वनराई, उंच-उंच वृक्षांची लागलेली स्पर्धा, लाल मातीने जिवाभावाची नाती असं साधंसोपं वर्णन केलं जात आहे. इथला निसर्ग तसा प्रतिकूल असला तरी त्यातून मार्ग काढत समाधान मानत परिसरातील नागरिक गुण्यागोविंदाने राहत आले आहेत.जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या ‘पर्यटनक्षम’ धरणाबरोबरच धरणक्षेत्राच्या जवळ असलेल्या स्वत:च्या मालकीच्या अतिरिक्त जमिनी विश्रामगृहे आणि रिक्त वसाहतीचा विकास खासगी व सरकारी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर खासगी यंत्रणांकडून करण्याच्या धोरणाला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे.यामुळे चासकमान धरणाच्या परिसरात पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांना हक्काचा व्यवसाय करून रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय, पाटबंधारे विकास महामंडळाला महसूलही मिळेल. धरण परिसरात पर्यावरणपूरक मनोरंजन पार्क, पर्यटनस्थळे, विश्रामगृह विकसित करणे, तंबू सोय, जलक्रीडा, नौकानयन, प्रदर्शन केंद्र, हिल स्टेशन आदी सोयीसुविधा धरण परिसरात उभारल्यास पर्यटन व्यवसाय, उद्योगधंदे, संस्कृती यांची नव्याने ओळख होईल.......चासकमान धरण परिसरात काय पाहता येईल?चास गावात काशीबाई पेशवे यांचे जन्मघर, पेशवेकालीन वाडा, काशीबाईंनी भीमा नदीकाठी बांधलेले सोमेश्वर मंदिर, भौगोलिक महत्त्व प्राप्त झालेले रांजणखळे, पुरातन लक्ष्मी-विष्णू मंदिर, कडधे येथील खंडोबा मंदिर, बीबी परिसरातील शंभू महादेव मंदिर, वाडा येथील गडदूबाई मंदिर, भातशेती या सर्व गोष्टी या परिसरातील वैभव आहे.......निसर्गाने चासकमान धरण परिसराच्या पदरात सौंदर्याचे दान भरभरून टाकले आहे. निसर्गाचे हे अद्भुत रंग व त्यातील सौंदर्य पाहण्यासाठी पाहिजे ती सौंदर्यदृष्टी. पावसाळा सुरू झाल्यानंतर एरवी भकास वाटणारी उजाड माळराने, डोंगरही पानाफुलांचा, झाडाझुडपांचा हिरवा साज पांघरतात. यामुळे एक वेगळेच सौंदर्य त्यांना प्राप्त होते.

टॅग्स :KhedखेडDamधरणtourismपर्यटन