आयएनएस शिवाजी मधील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: October 14, 2016 19:00 IST2016-10-14T19:00:57+5:302016-10-14T19:00:57+5:30
लोणावळ्याजवळील भारतीय नौसेनेच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण केंद्रातील जवानाने आत्महत्या केली.

आयएनएस शिवाजी मधील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १४ - लोणावळ्याजवळील भारतीय नौसेनेच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण केंद्रातील जवान सिताराम हिरालाल पारसमल (वय २१, मूळ राहणार केरिया, दानसरोली, जिल्हा शिखर, राजस्थान) याने आज सकाळी ८ वाजण्यापुर्वी त्याच्या आयएनएस शिवाजी मधील राहत्या खोलीत मफलरने फँनला बांधत आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
आत्महत्या करण्या मागचे नेमके कारण समजु शकले नसून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर तपास करत आहेत.