शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आईची गळफास घेत आत्महत्या; सहा महिन्यांची मुलगी सापडली मृतावस्थेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:46 IST

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट...

वडगाव मावळ : एका महिलेने घरातील सिलींग फॅनला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. तर अवघ्या सहा महिन्याची तिची मुलगी देखील घरात मृत अवस्थेत आढळली. ही घटना वडगाव मावळ येथे शिवरात्रीच्या दिवशी घडली आहे. 

रागिणी महेश दुधाने (वय २९) श्रीशा महेश दुधाने  (वय ६ महिने, रा.जयमल्हार, रेसिडन्सी खंडोबा मंदिराजवळ) अशी मृत मायलेकींचे नावे आहेत.याबाबत मयुर दतात्रय दुधाने याने पोलिसांकडे माहिती दिली. 

वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश दुधाने हे बाहेर जाऊन कोचींग क्लास घेतात. त्यांनी या ठिकाणी स्वत:चा फ्लॅट घेतला आहे. गुरूवारी त्यांचा भाऊ मयुर घरी गेला असता दरवाजा आतून बंद होता. त्याने आपल्या वहिनीला दार उघडण्यासाठी आवाज दिला. दरवाजा ठोठावला. परंतू , दरवाजा न उघडल्याने त्याने त्याचा भाऊ महेशला फोन करून सांगितले की, वहिनी दरवाजा उघडत नाही. तू लगेच ये. नंतर महेश आला त्याने गॅलरीत प्रवेश करून काच फोडून घरात प्रवेश केला. मुख्य दरवाजाची कडी उघडली. बेडरूमचा दरवाजा तोडला. आत पाहिल्यानंतर रागिणी हिने गळफास घेतला होता. तर श्रीशा ही बेशुध्द अवस्थेत पडली होती.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक एस. जे. खोत यांनी भेट दिली. दोघींनाही शासकीय रूग्णालयात नेले. डाॅक्टरांनी तपासले असता मृत झाल्याचे घोषित केले. रागिणीच्या गळफास का घेतल्याचे कारण समजू शकले नाही तर लहान मुलीचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हा अहवाल आल्यानंतर समजणार आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस.जे. खोत करत आहे. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिसWomenमहिला