सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST2020-12-22T04:11:36+5:302020-12-22T04:11:36+5:30

पती शेखर रोकडे, सासु पुष्पा रोकडे, दीर प्रफुल्ल रोकडे (सर्व रा. चेंबुर, मुंबई) व विमल पांचाळ (रा. भिवंडी) अशी ...

Suicide of a married woman due to her father-in-law's harassment | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पती शेखर रोकडे, सासु पुष्पा रोकडे, दीर प्रफुल्ल रोकडे (सर्व रा. चेंबुर, मुंबई) व विमल पांचाळ (रा. भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. तर याप्रकरणी पती, सासू व दीर यांना घोडेगाव पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, अनिता रोकडे या चेंबूर मुंबई येथे पतीबरोबर राहत होत्या. घरच्यांच्या जाचाला कंटाळून त्या चास येथे आल्या होत्या. पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास करून तिला जगणे असहय करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने घोडनदीचे पात्रात पाण्याने भरलेल्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. याबाबत अनिताचे वडील अशोक यादव यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे करीत आहे.

Web Title: Suicide of a married woman due to her father-in-law's harassment