शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मंचर येथे महिला वकिलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 12:47 IST

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

ठळक मुद्देमृत्युपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद

मंचर : शहरातील एका महिलावकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .रूपाली वसंत थोरात( वय 32 )असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. महिला वकिलाने मृत्युपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर शहरातील विठ्ठल ओंकार या इमारतीतील सदनिका क्रमांक 403 मध्ये रूपाली वसंत थोरात ही महिला वकील राहत होती . रात्री घरी ती एकटीच होती . त्यानंतर तिने घरी फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर इमारतीचे मालक राजेश इंदोरे यांनी ही माहिती थोरात यांच्या कुटुंबीयांना दिली. पोलीस समवेत नातेवाईक सदर सदनिकेवर गेले त्यावेळेस रूपाली  थोरात यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले .यावेळी तेथे असलेल्या एका डायरीमध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही . माझ्या मृत्युनंतर माज्या मुलीचा सांभाळ बहिणीने करावा. तसेच माझी असलेली सर्व संपत्ती ही मुलीला द्यावी असे या महिला वकिलाने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे .दरम्यान मंचर उपजिल्हा रुग्णालयात रूपाली थोरात यांचे शवविच्छेदन करण्यात आले .त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .तानाजी रामचंद्र जाधव (रा. मंचर )यांनी याबाबतची माहिती मंचर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मयत दाखल केले आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पी.एम. मोरे करत आहेत.

टॅग्स :MancharमंचरDeathमृत्यूWomenमहिलाadvocateवकिल