सावकाराच्या तगाद्यामुळे आत्महत्या

By Admin | Updated: May 19, 2014 01:08 IST2014-05-19T01:08:35+5:302014-05-19T01:08:35+5:30

आकुर्डी येथील महिला सावकाराच्या छळाला कंटाळून राजगुरुनगरमधील प्रौढाने आत्महत्या केली.

Suicide due to lenders | सावकाराच्या तगाद्यामुळे आत्महत्या

सावकाराच्या तगाद्यामुळे आत्महत्या

राजगुरुनगर : आकुर्डी येथील महिला सावकाराच्या छळाला कंटाळून राजगुरुनगरमधील प्रौढाने आत्महत्या केली असल्याचे त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी उघड झाले असून, पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास नारायण गायकवाड (वय ४७, रा. राजगुरुनगर) यांचा विषारी औषध घेतल्याने ५ मे रोजी मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ८ मे रोजी त्यांच्या भावाला त्यांच्या शयनगृहात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत त्यांनी सुंदर गोरख कोकरे (रा. विद्यानगरी, आकुर्डी) हिच्याकडून १०% व्याजाने पैसे घेतल्याचे लिहिले होते. हे पैसे वसूल करण्यासाठी सुंदरने सुहासला घरी बोलावून घाणेरड्या शिव्या दिल्या, जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, प्रत्यक्षात हाताने मारहाणही केल्याचे नमूद होते.(वार्ताहर)

Web Title: Suicide due to lenders