शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगार संघटनांंना आता प्रतीक्षा लवादाच्या बैठकीची; कामगार मंत्रालय घेणार पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 13:03 IST

मजुरीवाढ, आरोग्य सुविथांवर संघटना ठाम

ठळक मुद्देऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात कारखान्यांचे बॉयलर पेटण्याची शक्यता

पुणे: कोरोनापासून विमा कवच मजुरीच्या दरात वाढ व आरोग्यसुरक्षा या मागण्या मान्य झाल्याशिवाय घराबाहेर पडणार नसल्याचा इशारा सरकारला देणाऱ्या ऊसतोडणी कामगार संघटनांना आता यासंबधी कामगार मंत्रालयाने स्थापन केलेल्या लवादाच्या बैठकीची प्रतीक्षा आहे. युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना हा लवाद स्थापन करण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, दिलीप वळसे, जयंत पाटील तसेच स्वतः मुंडे यांचा समावेश होता. आता अन्य सदस्य कायम असून गोपीनाथ मुंडे यांच्या जागेवर माजी मंत्री पंकजा मुंडे असून कामगारांच्या मजुरीतील वाढ व कामगारविषयक अन्य प्रश्नांवर लवादाकडूनच निर्णय होत असतो.राज्यातील ८ प्रमूख ऊसतोडणी कामगार संघटनांंनी कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक कामगाराचा ५ लाखांचा विमा काढावा, मरी टनामागे ४०० रूपये करावी व कामगारांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्यसुविथा द्याव्यात अशी मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एकही कामगार घराबाहेर पडणार नाही असा इशाराही दिला आहे.या संघटनांमधील ज्येष्ठ पदाधिकारी गहिनीनाथ थोरे म्हणाले, शरद पवार यांना आम्ही कामगारांच्या सर्व अडचणी सांगितल्या आहेत. काही लाख कामगारांचा जीव आम्हाला महत्वाचा वाटतो. त्यांचे आरोग्य महत्वाचे आहे. सरकारने ही जबाबदारी घ्यायला हवी. कारखान्यांमधील अधिकारी, संचालक ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असाच आमचा अनुभव आहे. लवादाच्या बैठकीत काय होते याकडे आमचे लक्ष आहे. कामगारांचे म्हणणे त्यांच्यापर्य़त पोहचवले आहे. आता या बैठकीचीच प्रतिक्षा आहे असे थोरे म्हणाले. दरम्यान ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात कारखान्यांचे बॉयलर पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्यातच ऊसतोडणी कामगारांना बाहेर पडावे लागणार आहे. बहुसंख्य कामगार नगरच्या पुढे बीड व मराठवाडा परिसरातीलच असून काही लाखांच्या संख्येने ते पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या ऊसक्षेत्रात ऊसतोडणीसाठी म्हणून स्थलांतर करतात. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने होणारे स्थलांतर प्रशासानासाठी आव्हान असणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारMantralayaमंत्रालय