साखर कारखाने, महिला बचत गटांना मिळणार वीज बिल वसुलीचे अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 02:44 AM2021-01-22T02:44:45+5:302021-01-22T02:47:13+5:30

सहकारी संस्थांना थकबाकीच्या ३० टक्के कमावण्याची संधी.

Sugar mills, women's self-help groups will get the right to collect electricity bills | साखर कारखाने, महिला बचत गटांना मिळणार वीज बिल वसुलीचे अधिकार

साखर कारखाने, महिला बचत गटांना मिळणार वीज बिल वसुलीचे अधिकार

googlenewsNext

विशाल शिर्के 

पिंपरी :  कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतींसह सहकारी साखर कारखाना, सहकारी सूत गिरणी, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महिला बचत गटांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यापोटी प्रति बिल पाच रुपये ते थकबाकीच्या ३० टक्के रक्कम मिळविण्याची संधी या संस्थांना मिळणार आहे.

कृषी आणि इतर वीज बिल थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणने काही धोरणात्मक बदल केले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील बिल वसुलीसाठी ग्रामपंचायतींना नेमण्याचे पाऊल महावितरणने उचलले. त्या पुढे जात महिला बचत गट आणि सहकारी संस्थांनादेखील बिल वसुलीचे अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतींना कृषी आणि इतर सर्व प्रकारच्या वीज बिल वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत. उर्वरित संस्थांना केवळ कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार असतील. या संस्थांना प्रति पावतीमागे पाच रुपये दिले जातील. 

अशी होईल संस्थांची नोंदणी -
- महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वेब पोर्टलद्वारे नोंदणी होणार.
- संस्थांना संगणकीय प्रणालीद्वारे कलेक्शन सेंटर कोड मिळणार.
- ग्रामपंचायत वगळता इतर संस्थांना बिल भरणा केंद्र मंजुरीनंतर महापॉवर पे या वॉलेटद्वारे कृषी ग्राहकांचा बिल भरणा करता येईल.
- सरपंच, ग्रामसेवक, संचालक यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड या माध्यमातून ग्रामपंचायत नोंदणीकृत होणार.
- सरासरी वीज बिल भरण्याच्या तीन दिवसाइतकी रक्कम अनामत म्हणून घेणार, अनामत रक्कम दरमहा सुधारित केली जाणार.

इतका मिळेल मोबदला  -
- प्रति वीज बिल पावतीमागे ५ रुपये.
- शेतकरी सहकारी संस्था व साखर कारखान्यांनी वसूल केलेल्या कृषी थकबाकी रकमेवर १० टक्के प्रोत्साहन रक्कम.
- उर्वरित संस्थांनी कृषी थकबाकी स्वीकारल्यास भरणा केलेल्या रकमेच्या ३० टक्के आणि चालू कृषी वीज बिलाचा भरणा केल्यास २० टक्के प्रोत्साहन मोबदला मिळेल.

Web Title: Sugar mills, women's self-help groups will get the right to collect electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.