शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याहून कोल्हापुरकडे जाणाऱ्या शिवशाही बसने कात्रज घाटात घेतला अचानक पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:14 IST

चालकाच्या तत्परतेने अनर्थ टळला..

ठळक मुद्दे शिवशाही बसमध्ये होते २९ प्रवासी

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. कात्रज भिलारेवाडीमध्ये याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.पुण्यावरून शिवशाही बस ( क्र. MH.12.E.8031)  कोल्हापूरकडे जात होती. कात्रज घाटाच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे सकाळी दहा वाजता भिलारेवाडी येथील आर्यन स्कुलच्या समोर  या गाडीने पेट घेतला. यामध्ये २९ प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.पुण्यावरून शिवशाही बस कोल्हापूर कडे जात होती. कात्रज घाटाच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे सकाळी दहा वाजता या गाडीने पेट घेतला.याबाबत सविस्तर माहिती अशी की,  शुक्रवारी सकाळी स्वारगेट डेपो वरुन ही बस कोल्हापूरला जात होती. कात्रज घाटाच्या चढण मार्गावर बस आल्यावर बस चे इंजिन गरम झाले आणि इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. बस चालक लीबाती पांडुरंग खराते यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान फायरमन रामदास शिंदे, महादेव मांगडे, पकंज इंगवले, सागर इंगळे, निलेश तागुंदे, शुभम शिर्के, रुपेश जांबले यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गाडीमध्ये प्रवासी होते आणि धूर मोठ्या प्रमाणात होता म्हणून गाडीची काचा फोडून धूर बाहेर पडण्यास वाट करून दिली. आणि काही मिनिटात आगीवर नियंत्रण आणले.

दरम्यान, शिवशाही बसमध्ये २९ प्रवासी होते. चालकाच्या आग लागल्याचे लक्षात आले, त्याने लगेच अग्निशामक केंद्राला संपर्क साधला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :katrajकात्रजShivshahiशिवशाहीfireआगAccidentअपघात