शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये; डीजेवर बंदी आणावी, कान गमावलेल्या सागरचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:02 IST

एक कानाने ऐकू येत आहे, दुसऱ्या कानात शिट्टी वाजतीये, अजूनही डीजेचा आवाज कानात घुमतोय, अधूनमधून असं चक्कर आल्यासारखं होतंय

पुणे: पुण्यात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर स्पीकरच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. कर्णकर्कश स्पीकर आणि आवाजाच्या दणक्याने नागरिक हैराण झाले होते. विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर जनजागृती करूनही मंडळांनी ऐकले नाही. त्यानंतर नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या उदभवल्याचे समोर आले आहे. अशातच वसंत मोरेंचे कार्यकर्ते सागर मोरे यांना या डीजेमुळे एक कान गमवावा लागला आहे. भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये. डीजेवर बंदी आणायला हवी असे भावनिक आवाहन सागर यांनी केले आहे. एका माध्यमाच्या चॅनेलशी संवाद साधताना त्यांनी भावना व्यक्त केली आहे. 

सागर मोरे हे घरातील कर्ता पुरुष आहेत. त्यांच्या वडिलांचे वय झालं आहे. त्यांचे लग्न झाले असून लहान दोन मुलीसुद्धा आहेत. आता त्यांनी एक कान गमावला आहे. पुढं घराचं कस होणार? पोरींकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे. विसर्जनाच्या दिवशी नेमकं काय घडलं हे सागर यांनी सांगितलं आहे.  मी डीजेच्या समोर नाचत होतो. चार तास तिथेच होतो. तेव्हा काही जाणवलं नाही. चारही बाजूने डीजे कात्रज चौकात आले. अर्धा पाऊण तास एका चौकात ते वाजवत होते. त्यावेळी काही जाणवलं नाही. थोड्या वेळाने कात्रज तलावाजवळ गेल्यावर काहीच ऐकू येत नव्हतं. त्यानंतर मी वसंत मोरेंशी संपर्क साधून भारती हॉस्पिटलला गेलो. दवाखान्यात गेल्यावर एक कान ९५ टक्के डॅमेज झाला होता. तर दुसरा ६० टक्के डॅमेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मी सध्या एक कान गमावला आहे. दुसऱ्या कानाने ७० टक्के ऐकू येतंय. वेळेत दवाखान्यात गेल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले. त्यामुळे एका कानाला ७० टक्के फरक पडला. दुसऱ्या कानाने अजूनही ऐकू येत नाहीये. भविष्यात अशी कोणावरही वेळ येऊ नये. माझ्याबाबतीत जे काही घडलं ते कोणाच्या बाबतीत हे घडू नये. डीजेवर बंदी आणायला हवी. 

म्हणून थोडंफार कव्हर झालं

आता कानात शिट्टी वाजत आहे. अजूनही डीजेचा आवाज कानात घुमतोय. अधूनमधून असं चक्कर आल्यासारखं होतंय. दोन तीन दिवस मला कोण काय बोलतंय हे कळत नव्हतं. घरातले लोक मला पानावर लिहून देत होते. डॉक्टरांनी कान व्यवस्थित होईल अशी गॅरंटी दिली नाही. पण औषध घ्यायला सांगितलं आहे. कान व्यवस्थित व्हायला थोडं उशिरा होईल असंही सांगितल आहे. वेळेत दवाखाना केला म्हणून थोडंफार कव्हर झाल्याचे सागर यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४musicसंगीतdoctorडॉक्टरkatrajकात्रज