शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ यकृत आजाराशी चिमुकलीची यशस्वी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 19:41 IST

गुंतागुंतीच्या परिस्थितीवर यशस्वीपणे मात करत डॉक्टरांनी तिची जगण्यासाठीची झुंज यशस्वी केली.

ठळक मुद्देसह्याद्री रुग्णालयामध्ये नुकतीच तिच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाआर्थिक परिस्थिती अडथळा ठरत असल्याने काही रुग्णालयांनी दिला नकार

पुणे : जन्माला आल्यानंतर वर्षभरातच तिची यकृताच्या दुर्मिळ आजाराशी झुंज सुरू झाली. सुरूवातीचे काही महिने नेमका आजार कोणता हे कळण्यात गेली होती. दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालल्याने आई-वडिलांची चिंता वाढली. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर यकृतासह मुत्रपिंड निकामी होण्याचा धोका होता. त्यातच यकृताचा कर्करोग होण्याची लक्षणे व यकृत प्रत्योरापणानंतर नवीन यकृत स्वीकारण्यास झालेला अडथळा... अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीवर यशस्वीपणे मात करत डॉक्टरांनी तिची जगण्यासाठीची झुंज यशस्वी केली. स्वरा असे तिचे नाव. वय फक्त अडीच वर्षे. कराड येथील सुहास व रेश्मा शिंदे यांची ती मुलगी आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये नुकतीच तिच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ती इतर लहान मुलांप्रमाणेच आपले आयुष्य जगत आहे. स्वरा ही एक वर्षाची असताना तिचे यकृत निकामी झाल्याची लक्षणे दिसू लागली. तिच्यावर उपचारासाठी वडील राज्यासह राज्याबाहेरही अनेक रुग्णालयांमध्ये गेले. पण आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत असल्याने काही रुग्णालयांनी नकार दिला. तर काही ठिकाणी नेमका आजार निष्पन्न होत नव्हता. दीड वर्षाची असताना तिला ‘टायरोसिनेमिया’ हा दुर्मिळ चयापचयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. पण खचून न जाता सुहास यांनी हार मानली नाही.सह्याद्री रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभुते यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, उपचार सुरू केले तेव्हा तिचे वय अडीच वर्षे एवढे होते. तर वजन केवळ ५.९ किलो. रुग्णालयात उपचार सुरू केले तेव्हा तिच्या हातपाय व छातीपमध्ये विकृती दिसून येत होती. यकृतामध्ये कर्करोगाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे प्रत्यारोपण पुढे ढकलावे लागले. यातून ती बरी झाल्यानंतर प्रत्योरापण करण्यात आले. यासाठी तिची आईच दाता म्हणून पुढे आली. ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांप्रमाणेच मुलीच्या शरीराने दिलेला प्रतिसादही महत्वाचा ठरला. रुग्णालयातील डॉ. स्नेहवर्धन पांडे, डॉ. सागर लाड, डॉ. शीतल महाजनी, डॉ. दिनेश बाबू यांच्यासह इतर डॉक्टरांचे सहकार्य महत्वाचे होते.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर