यशस्वी लोकांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास यश : पांडुरंग कंद
By Admin | Updated: February 15, 2017 01:45 IST2017-02-15T01:45:58+5:302017-02-15T01:45:58+5:30
प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी ‘इन्स्टंट’च्या जमान्यात तरुणांना यशही तत्काळ मिळावे, असे वाटते. तत्त्वाशी तडजोड करून, शॉर्टकटचा

यशस्वी लोकांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास यश : पांडुरंग कंद
भिगवण : प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी ‘इन्स्टंट’च्या जमान्यात तरुणांना यशही तत्काळ मिळावे, असे वाटते. तत्त्वाशी तडजोड करून, शॉर्टकटचा वापर करून मिळविलेले यशही तात्पुरतेच असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. यशस्वी लोकांच्या चरित्रांचा अभ्यास केल्यास यशाचा महामार्ग हमखास सापडेल, असे मत पुणे येथील गरवारे महाविद्यालयातील प्रा. पांडुरंग कंद यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व येथील कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. व्याख्यानमालेचे समारोप कार्यक्रमाचे पुष्प गुंफताना ‘ज्यांच्या हाती शून्य होते’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. भास्कर गटकुळ होते. डॉ. प्रज्ञा लामतुरे, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. शाम सातर्ले, प्रा. सुरेंद्र शिरसट कायर्क्रम समन्वयक प्रा. संदीप साठे उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजीमहाराज व आजची तरुण पिढी’ या विषयावर बोलताना प्रा. प्रकाश पांढरमिसे म्हणाले, ‘‘तरुणांनी शिवाजीमहाराजांच्या विचारानुसार वागावे.’’ प्राचार्य गटकुळ म्हणाले, ‘‘व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल होतो. विद्यार्थ्यांमध्ये कुटुंबाविषयी, समाजाविषयी व देशाविषयी प्रेम, आपुलकी निर्माण करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी व्याख्यानातून मांडलेल्या विचारातून रुजेल.’’