नरसिंह क्रीडा मंडळाचे खो-खो स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST2021-02-24T04:13:05+5:302021-02-24T04:13:05+5:30

पुणे जिल्हा खो खो असोसिएशन व नवमहाराष्ट्र संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी ...

Success of Narasimha Krida Mandal in Kho-Kho competition | नरसिंह क्रीडा मंडळाचे खो-खो स्पर्धेत यश

नरसिंह क्रीडा मंडळाचे खो-खो स्पर्धेत यश

पुणे जिल्हा खो खो असोसिएशन व नवमहाराष्ट्र संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा (पुरुष-महिला ) नुकत्याच स. प. महाविद्यालय पुणे येथे पार पडल्या.

या स्पर्धेत रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाच्या महिला संघाने अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ संघ पिंपरी चिंचवड संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

नरसिंह क्रीडा मंडळाने महिला गटात मिळवलेले हे सलग सहावे विजेतेपद आहे. संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे काजल भोर -खेडेकर, स्नेहल जाधव, भाग्यश्री जाधव, दिव्या जाधव, श्वेता वाघ, ऋतुजा भोर, प्रिया भोर, स्नेहा भोर, प्रांजल जाधव, वैष्णवी वाघ, पूर्वा वाघ, नीलम वाघ.

विजयी खेळाडूंना प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, पुणे जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव शिरीन गोडबोले यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

Web Title: Success of Narasimha Krida Mandal in Kho-Kho competition