शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग

By नितीन चौधरी | Updated: February 26, 2025 09:13 IST

आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहे, हे शेतकऱ्याला कळू शकणार

पुणे : सातबारा उताऱ्यानुसार नकाशे उपलब्ध नसल्याने हद्दीचे वाद राज्यात नवीन नाहीत. यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात असून, भावकीतही अनेक वाद निर्माण झाले आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने प्रत्येक सर्व्हे क्रमांकाला नकाशाची जोड देण्याचे ठरविले आहे. यातून आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहे, हे शेतकऱ्याला कळू शकणार आहे.पर्यायाने हद्दीवरून होणारे वाद तर टळतीलच तसेच खरेदी-विक्री व बँकांकडून कर्जाची उपलब्धतादेखील विनासायास होण्यास मदत होणार आहे. राज्यातील बारा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, लवकरच त्याला मुहूर्त लागणार आहे.

एका सातबारा उताऱ्यात अनेक खातेदार असल्याने त्याचे पोटहिस्से तयार केले जातात. या पोटहिस्स्यांमधील जमीनमालकांना मात्र एकाच सातबारा उताऱ्यावर अवलंबून राहावे लागते. अशा पोट हिस्सेदाराला जमीन विक्री करावयाची असल्यास इतर सर्व खातेदारांची संमती घ्यावी लागते. तसेच एखाद्या हिस्सेदाराला जमीन मोजणी करावयाची असल्यास अन्य सर्व पोटीसचेदारांची संमती बंधनकारक असते. खरेदी - विक्रीतही अनेक बंधने येत असल्याने वादही निर्माण होतात अनेकदा हे वाद न्यायालयातही जातात. 

यावर तोडगा काढण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने राज्यातील बारा तालुक्यांमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक सातबाराच्या पोट हिस्स्याची मोजणी आणि त्याच्या नकाशाचे अद्ययावतीकरण करण्याचे ठरविले आहे. यात प्रत्येक सर्व्हे क्रमांकातील क्रमांकाचे सर्वेक्षण होऊन मोजणीनुसार नकाशा तयार केला जाणार आहे. त्यामुळे सातबारा अद्ययावत होऊन नकाशादेखील उपलब्ध होणार आहे. जमीन खरेदी-विक्री प्रकरणांमध्ये सातबारा उताऱ्यानुसार नकाशा असल्याने विनावाद खरेदी - विक्री होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे अन्य खातेदारांची संमतीची गरज भासत नसल्याने वाददेखील टळणार आहेत. राज्यातील बारा तालुक्यांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. 

प्रत्येक सर्व्हे क्रमांकानुसार नकाशा असल्याने त्या गावातील जमीन मालक व जमिनीचे क्षेत्रदेखील निश्चित होऊ शकणार आहे. हे खूप मोठे काम असून, त्याला लवकरच सुरुवात होणार आहे. - डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमिअभिलेख संचालक, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजना