शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो, पीएमपीकडे वळा;  बसचे मार्ग, पास सवलतीच्या माहितीची जनजागृती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 19:29 IST

विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पीएमपीकडून जनजागृती केली जाणार

ठळक मुद्देसध्या मासिक ७५० रुपयांचा विद्यार्थी पास उपलब्ध

पुणे : प्रवाशांना बससेवेकडे वळविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नुकताच बस डे साजरा करण्यात आला. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही बसने प्रवास करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयांमध्ये परिसरातून जाणाऱ्या बसचे मार्ग, पास सवलतीच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहे. तसेच पीएमपीचे कर्मचारीही महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करतील. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये अनेक महाविद्यालये असून विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातील अनेक विद्यार्थी बसचा वापर करतात. तर अनेक विद्यार्थी दुचाकीने महाविद्यालयात येतात. या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पीएमपीकडून जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिला जातो. सध्या मासिक ७५० रुपयांचा विद्यार्थी पास उपलब्ध आहे. पीएमपीच्या बसची स्थिती आता सुधारू लागली आहे. ई-बससह नवीन सीएनजी बस ताफ्यात दाखल होत आहेत. महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनाही सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. सुरक्षित व आरामदायी सेवेमुळे या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे खासगी वाहनाचा वापर न करता विद्यार्थी तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनीही बसचा वापर करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना वाहतुक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ताफ्यामध्ये नवीन बस दाखल होत आहे. पासची सवलत असल्याने विद्यार्थ्यांना कमी खर्चात बससेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसने प्रवास करावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे. सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी पत्रव्यवहार केला जात आहे. आवारामध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करणारे फलक लावले जातील. तसेच त्यावर महाविद्यालय परिसरातील थांबे व तेथून जाणाऱ्या बसची माहिती दिली जाईल. पास सवलतीचा उल्लेखही त्यावर केला जाणार आहे. पास विभागाचे कर्मचारी काही महाविद्यायांमध्ये पास कामासाठी जातात. त्यांच्यामार्फतही जनजागृती केली जाणार आहे.------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय