शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

विद्यार्थ्यांनी तयार केली शाळेच्या संस्थापकांची शिल्पे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:24 IST

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल तर्फे मुलांमधील कलागुण वाढीस लागावे, त्यांना अापली कला जाेपासता यावी या हेतून सर्जन हा उपक्रम राबविण्यात येताे. त्या अंतर्गत तब्बल 900 विद्यार्थ्यांनी शाळेच्या संस्थापकांची शिल्पे तयार केली.

पुणे : सगळीकडे इंग्रजी शाळांचं वारं वाहताना अापण सध्या पाहताेय. पालक वर्षाला लाखभर रुपये भरुन अापल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेत अाहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांशिवाय पुढे गत्यंतर नाही, असा समज समाजात रुढ हाेत असताना पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेने हा समज खाेडून काढत मराठी शाळा शैक्षणिक दृष्ठ्या किती सुदृढ अाहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केले अाहे. मुलांमधील कलेला प्राेत्साहन मिळावे या हेतूने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 'सर्जन' हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमांतर्गत नुकताच  विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक लाेकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गाेपाळ अागरकर, महादेव नामजाेशी यांची शिल्पे स्वतः तयार केली अाहेत. यातही एक दाेन नव्हे तर तब्बल 900 हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला हाेता.     शाळेचे मुख्याध्यापक नागेश माेने यांनी मुलांना शिक्षणाबराेबरच इतर कलांची अावड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुण जाेपासता यावेत तसेच अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा या उद्देशाने त्यांनी सर्जन या उपक्रमाची संकल्पना मांडली. याअंतर्गत चित्र, शिल्प, संगीत यांमध्ये अावड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात अाले. डाॅ. मुकुंद राईलकर यांनी मुख्याध्यापकांना स्वतः तयार केलेल्या शाळेच्या संस्थापकांची शिल्पे भेट दिली हाेती. त्यावरुन अापल्या विद्यार्थ्यांना यांचं प्रशिक्षण मिळावं, तसेच स्वतः तयार केलेली शाळेच्या संस्थापकांची शिल्पे विद्यार्थ्यांच्या घरी असावीत या उद्देशाने संस्थापकांची शिल्पे तयार करण्याचा उपक्रम शाळेत राबविण्यात अाला. यात अाठवी ते दहावी इयत्तेतील 900 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. शाळेने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शिल्प तयार करण्याचे सर्व साहित्य दिले. मार्चमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात अाली हाेती. विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्फुर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे संस्थापकांची शिल्पे तयार करण्याची कल्पना विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर  एकही विद्यार्थी नाही म्हंटला नाही. विद्यार्थ्यांनी मेहनत घेत शिल्पे तयार केली. तसेच ती शिल्पे एका बाॅक्समध्ये पॅक करुन त्यावर त्या संस्थापकाची माहिती देण्यात आली.  हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात तसेच सर्जन द्वारे मुलांमध्ये कलागुण जाेपासण्यात शाळेच्या सर्जन मंडळाचे प्रमुख सुरेश वरगंटीवार यांचा माेठा वाटा अाहे.  तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व चित्रकार मंगेश कुडले यांची या उपक्रमासाठी माेलाची मदत झाली.     मुख्याध्यापक नागेश माेने म्हणाले, मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलांची माहिती व्हावी, तसेच पुस्तकी ज्ञानाबराेबरच इतर कला विद्यार्थ्यांना जाेपासता याव्यात यासाठी सर्जन हा उपक्रम सुरु करण्यात अाला. मुलांना शिल्पकलेचा अनुभव मिळावा तसेच शाळेच्या संस्थापकांची विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शिल्पे त्यांच्या घरी असावीत या हेतून हा शिल्पे तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात अाला. त्याला विद्यार्थ्यांनी माेठा प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा निवडण्यासही मदत हाेणार अाहे. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी