शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या दप्तराला शनिवारी मिळणार सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 23:20 IST

शिक्षण विभागाचा निर्णय : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वांगीण कार्यक्रम, शाळेतील उपस्थितीही वाढणार

पुणे : एकीकडे क्लिष्ट असणारा अभ्यासक्रम, रोजच्या विविध तासिका आणि पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. हे ओझे चिमुकल्या खांद्यावर रोज वाहावे लागत असल्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे हे ओझे कमी करण्यासाठी एक वर्षी एक पुस्तक एक उपक्रमासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यात आणखी एक पाऊल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने उचलले असून आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आता दप्तराविना राहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाठी शनिवारी विविध उपक्रम शाळेत राबविण्यात येणार आहेत.

विविध विषय, त्यांच्या रोजच्या होणाऱ्या तासिंकामुळे पाठीवर जड दप्तर घेऊन जाणारे विद्यार्थी रोज दिसायाचे. विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांच्या तब्येतीच्या तुलनेत दप्तराचे ओझे हे जास्त असायचे, यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते. हे ओझे कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, दप्तराच्या ओझ्यात काही बदल झाला नव्हता. हे ओझे कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषतेर्फे एक पुस्तक एक वही हा क्रांतिकारकनिर्णय मुख्यकार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला होता. हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आणखी दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागार्फे आणखी एक नवा उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी विद्यार्थ्यांची असलेली कमी पटसंख्या पाहता यात वाढ व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणापासून दिलासा मिळावा, या हेतूने यापुढे प्रत्येक शनिवारी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तर दिसणार नाही. शिक्षण विभागाकडून शनिवार हा ‘दप्तरविना’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. मुलांना बौद्धिक विकासाबरोबरच इतर उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी यामुळे मिळणार आहे. या मागे दप्तराचे ओझे कमी करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हा मुख्य उद्देश आहे. शनिवारी शाळा लवकर असल्याने अनेकांकडून शाळा बुडवली जाते. सर्व विद्यार्थी नियमित येण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारी विनादप्तर आलेल्या विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार, योगा तसेच इतर खेळांचे प्रकार घेतले जातात. प्रत्येक शाळांना अध्ययन समृद्धीची किट देण्यात आली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातो. भाषा आणि गणित विषयांमध्ये विद्यार्थी मागे राहतात. तर काही शाळांना अध्ययन समृद्धी कीट देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून शनिवारी अध्ययन समृद्धी किटच्या सहाय्याने अभ्यास घेतला जातो. यामध्ये अंकगणित, अंकवाचन आदी उपक्रम घेतले जातात.विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे कमी व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘एक दिवस दप्तराविना’ या उपक्रमामुळे रोजच्या अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थी नव्या गोष्टी शिकतील. यामुळे त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत मिळेल. तसेच शाळेतील त्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही वाढेल.- सूरज मांढरे,मुख्य कार्यकारी अधिकारीविद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी या उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे अध्यापना सोबतच विद्यार्थ्यांचा इतर सर्वांगीण विकास होईल. सह शालेय उपक्रमांमधून जे शिकवणे अपेक्षित आहे ते साध्य होईल.- सुनील कुºहाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळा