शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्द झाल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार शुल्क परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:43 IST

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने निर्णय ; शाळांकडून होणार रक्कमेचे वितरण

पुणे : कोरोना काळात इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आकारण्यात आलेले शुल्क परत द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार राज्य मंडळाने परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अंशत: शुल्क परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना व शाळांना येत्या १२ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांचा तपशील नोंदवता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे २०२१ मधील दहावी-बारावीच्या मुख्य परीक्षा रद्द करण्यात आल्या. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल १३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी तर बारावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, कोरोनामुळे परीक्षा न घेता निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल तयार करण्यासाठी व अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी राज्य मंडळाकडून आॅनलाईन यंत्रणा उभी करण्यात आली. त्यासाठी झालेला खर्च वजा करून उर्वरित रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५९ रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९४ रुपये परत दिले जाणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांकडून अकरावी सीईटीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ९४ रुपये शुल्कातून सीईटीचे ३५ रुपये शुल्क वजा करून त्यांना ५९ रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य मंडळातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या लिंक व पात्र विद्यार्थ्यांची निश्चिती करावी लागणार आहे. त्यानंतर राज्य मंडळातर्फे संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे शुल्क जमा केले जाईल.

राज्य मंडळाला तब्बल २२ कोटींचा तोटा-दहावी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने राज्य मंडळाला दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांना तब्बल ९ कोटी ७८ लाख २२ हजार रुपये तर बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांना तब्बल १२ कोटी ९७ लाख २० हजार रुपये शुल्क परतावा द्यावा लागणार आहे. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्याने मंडळाला तब्बल २२  कोटींचा तोटा झाला असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा