शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाईन प्रमाणपत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:18 IST

विद्यार्थ्यांच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी ई-ट्राईब व्हॅलिडीटी डॉट महाआॅनलाईन या संकेतस्थळावर अर्ज करावा.

ठळक मुद्देआदिवासी संशोधन संस्था : विशेष हेल्पलाईन कक्ष स्थापनअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था

पुणे : शैक्षणिक सवलतींसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी नंतरच्या पदविका-पदवी आणि इतर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेताना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळविणे सोयीचे जावे यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे विशेष आॅनलाईन मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून अर्ज केल्यास विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक जलद होणार आहे.  नुकताच इयत्ता दहावी आणी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावाधाव सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नंदूरबार व गडचिरोली अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. विद्यार्थ्यांच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी ई-ट्राईब व्हॅलिडीटी डॉट महाआॅनलाईन या संकेतस्थळावर अर्ज करावा. त्यानंतर त्यांना प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित समितीच्या पोलीस दक्षता पथकाला शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे ०२०-२६३६०९४१ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्यावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल.सर्व आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सदर मोहिमेच्या कामकाजाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पुणे समितीसाठी पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील विद्यार्थी क्विन्स गार्डन येथील संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनCaste certificateजात प्रमाणपत्रMaharashtraमहाराष्ट्र