शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पंचविशीच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीस पात्र          

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:14 IST

एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असतील. त्यामुळे शिक्षणाची आवड असणारे गुणवत्ताधारक विद्यार्थीच निवडणूक लढवू शकतील,

ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य व पोलीस प्रशासनाबरोबर निवडणुकांबाबत चर्चा निवडणूक काळात महाविद्यालयाच्या आवारात आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणारकोणत्याही अपराधाकरिता दोषी ठरवलेला विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र

पुणे : महाविद्यालय व विद्यापीठामध्ये खुला पध्दतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये केवळ २५ वर्षे वयाच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीसाठी पात्र असतील. त्यातही मान्यताप्राप्त,नियमित आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता येईल. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असतील. त्यामुळे शिक्षणाची आवड असणारे गुणवत्ताधारक विद्यार्थीच निवडणूक लढवू शकतील, असे निवडणुकीच्या नियमावलीवरून स्पष्ट होत आहे.

महाविद्यालयांमधील खुल्या निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली असून विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य व पोलीस प्रशासनाबरोबर निवडणुकांबाबत चर्चा केली आहे. महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्राधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर निवडणूक काळात महाविद्यालयाच्या आवारात आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार करता येणार नाही. तर विद्यार्थी उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या आवारात शांतता व सलोखा राखण्यासाठी स्वयंप्रेरणेने मदत करावी लागेल.

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यापासून सात शैक्षणिक वर्ष पूर्ण केलेले असतील. तसेच कोणत्याही विद्यापीठ परीक्षेतील गैरप्रकारामध्ये गुंतल्यामुळे किंवा कोणतीही गैरवर्तन केल्यामुळे सक्षम अधिकाऱ्याने विद्यार्थ्याला शिक्षा केली असल्यास संबंधित विद्यार्थी निवडणूक लढवू शकणार नाही. नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरिता दोषी ठरवलेला विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असेल . त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या व गुणवंत विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता येईल.विद्यार्थी निवडणुकांसाठी काही विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला निवडणूक लढता येणार नाही. तसेच निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही शैक्षणिक वर्षातील ३० सप्टेबर रोजीपर्यंत पंचवीस वर्ष एवढीच असावी. राखीव प्रवर्गाच्या प्रतिनिधींकडे निवडणुकीचा अर्ज सादर करताना सक्षम अधिकाऱ्या ने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. --

महाविद्यालयामध्ये शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात, या उद्देशाने सर्व बाजूंचा विचार करून महाविद्यालयीन निवडणुकांची नियमावली तयार केली आहे. विद्यार्थी निवडणुकांमुळे यापूर्वी महाविद्यालयात खून, मारामाऱ्या अशा घटना घडल्या होत्या. परिणामी प्राचार्य व संस्थाचालकांनी निवडणुकांंना विरोध केला होता. त्यामुळे यंदा या निवडणुकांबाबत काळजी घेतली जात आहे.पंचवीस पेक्षा जास्त वर्षे वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक लढवता येऊ नये. तसेच केवळ निवडणुकांसाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अटकाव बसावा, याचा विचार करून निवडणुकांबाबतची नियमावली तयार केली आहे.- डॉ.ए.पी.कुलकर्णी,प्रांतप्रमुख,विद्यापीठ विकास मंच,

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूकStudentविद्यार्थी