ऑनलाईन अभ्यासाने विद्यार्थ्यांचा वाढतोय ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:39+5:302021-07-07T04:12:39+5:30
खोर : कोरोना आला अन् सगळे जीवनच ऑनलाईन झाले..! तब्बल दीड वर्षापासून कोरोनाच्या रोगाने चांगलेच थैमान घातले असून, याचा ...

ऑनलाईन अभ्यासाने विद्यार्थ्यांचा वाढतोय ताण
खोर : कोरोना आला अन् सगळे जीवनच ऑनलाईन झाले..! तब्बल दीड वर्षापासून कोरोनाच्या रोगाने चांगलेच थैमान घातले असून, याचा सर्वाधिक फटका आज शिक्षण विभागाला बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या झपाट्याने शिक्षण व्यवस्था कोलमडली. संपूर्ण शिक्षण विभाग ऑनलाईन होऊन बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला घेतल्याने ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर भर दिला गेला. मात्र, ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे आज विद्यार्थी वर्गांची डोकेदुखी ठरत आहे. अनेक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर संगममताने ऑनलाईन अभ्यास करीत असतात. तर ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन अभ्यास करीत असताना खेडेगाव असल्याने मोबाईल टॉवर, रेंजचा सर्वाधिक समस्या सध्या जाणवत असताना दिसत आहे. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत ऑनलाईन शिक्षण चालू केले आहे.
खोर (ता. दौंड) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन शाळा सुरू केली आहे. दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत व संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यावर भर दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतच बसून अभ्यासक्रम समजून घेण्यास अडचण येत असते, तर हा ऑनलाईन पद्धतीच्या अभ्यासक्रम मुलांना कसा समजून घेता येईल? हाच प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांच्या पालकांना पडत आहे. खोरच्या श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीची पटसंख्या ५३ आहे. मात्र, आज ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी केवळ १५ ते २० मुले हजेरी दर्शवितात.
भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. लोणकर म्हणाले की, ऑनलाईन शिकवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तालुका पातळीवर व गावपातळीवर विचार करून ऑनलाईन शिक्षण बंद करून आठवड्यातून किमान दोन वेळा ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याची परवानगी मिळावी.
ऑनलाईन शिकवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तालुका पातळीवर व गावपातळीवर विचार करून ऑनलाईन शिक्षण बंद करून आठवड्यातून किमान दोन वेळा ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याची परवानगी मिळावी.
-के. एस. लोणकर, मुख्याध्यापक, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, खोर
------
तब्बल दीड वर्षापासून मुलांच्या शाळा बंद झाल्या आहेत. मुलांची शिक्षणाच्या बाबतीतील गोडी ही कमी होण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन शिक्षण घेण्यास देखील मुले टाळाटाळ करीत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाची सावट कमी आहे. प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी.
-प्रकाश साळुंके, पालक, खोर
खोर (ता. दौंड) येथे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करताना. तर काही ठिकाणी मुख्याध्यापक के. एस. लोणकर घरोघरी जाऊन मुलांना शिकवीत आहेत.