शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांच्या अनियमितेविरुद्ध विद्यार्थ्यांचा एल्गार, शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 11:08 IST

स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, राज्यातील १ लाख ७० हजार रिक्त पदे तातडीने भरावीत, राज्यसेवा परीक्षेच्या पदांमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

पुणे- स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, राज्यातील १ लाख ७० हजार रिक्त पदे तातडीने भरावीत, राज्यसेवा परीक्षेच्या पदांमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले आहेत.स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समनव्य समितीच्यावतीने राज्यातील विविध शहरांमध्ये या मोर्चाचे आयोजन केले आहे. पुण्यामध्ये आज (गुरुवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास शनिवार वाडा येथून मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या मोठी असल्याने मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या- राज्यातील १ लाख ७० हजार रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. - केंद्र सरकारच्या ४ लाख २० हजार जागा रद्द न करता त्यादेखील त्वरित भरण्यात याव्यात. - राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करण्यात यावी, प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी.- स्पर्धा परीक्षेमध्ये चाललेल्या डमी सारख्या गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवावा, बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी.- आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द होतात त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण आयोगाने द्यावे.- परीक्षा केंद्रावरती मोबाइल जॅमर सारखी यंत्रणा बसवावी.- स्पर्धा परीक्षांमधील भरती घोटाळा उघडकीस आणणारे योगेश जाधव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी.-  परीक्षा केंद्रामधील बैठक व्यवस्था हि सुसज्ज असावी,  परीक्षेसाठीची प्रवेश फी हि माफक असावी जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. - खाजगी तत्वावर तात्पुरती पदे भरण्याची पद्धत रद्द करून कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी.- संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वी प्रमाणे स्वतंत्र परीक्षा पद्धत राबवावी, - विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठीचे केंद्र हे नागपूर याठिकाणी ठेवावे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी