शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची कमान व पत्रा अंगावर पडून विद्यार्थी झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 02:00 IST

जेवणाची सुटी झाल्याने अनर्थ टळला

सासवड : नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीवर असणारी नावाची कमान व्हरांड्याच्या पत्र्यावर पडून व पत्रा अंगावर पडल्याने चार लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये तीन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. सर्व मुले १ ली ते ५ वीच्या वर्गातील आहेत. घटना घडण्याच्या पूर्वी त्याच व्हरांड्यात विज्ञान प्रदर्शन सुरू होते. दुपारी जेवणाची बेल झाल्यानंतर सर्व मुले वर्गातून जेवणाचे डबे घेऊन बाहेर जात होती. त्याच वेळी पत्रा अंगावर पडून ही घटना घडली. केवळ ५ ते १० मिनिटांत ही घटना घडली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.यामध्ये हर्षदा विकास पोटे (वय ११), आर्यन रामदास बोरकर (वय ७), समर्थ रोहिदास राऊत (वय ११) आणि करण रेशमाजी वाघमारे (वय ७) हे चार विद्यार्थी जखमी झाले. यातील हर्षदा विकास पोटे या विद्यार्थिनीस पत्रा कापून जास्त मार लागला आहे. घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.नारायणपूर येथे प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू होते. बुधवारी शाळेत विज्ञान प्रदर्शन असल्याने शाळेच्या व्हरांड्यात सर्व मुले व्यस्त होती. सकाळी १२ ते १.३० या वेळेत विज्ञान प्रदर्शन होते. दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे जेवणाच्या सुटीची बेल झाल्याने सर्व मुले वर्गातून जेवणाचे डबे घेऊन बाहेर पडत होती. काही मुले बाहेर आली, तर काही मुले बाहेर येत असताना अगोदरच पडायला झालेल्या शाळेच्या व्हरांड्यावरील कमानीची भिंत व पत्रे अचानक खाली पडले. यावेळी पाच ते सहाच मुले तेथे होती. अचानक घडलेल्या घटनेने एकच गोंधळ उडाला.या घटनेची माहिती मिळताच पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, नायब तहसीलदार धनंजय जाधव, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच सासवड येथे पंचायत समिती सभापती अर्चना जाधव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, प्रांताधिकारी संजय आसवले, प्रदीप पोमण, विठ्ठल मोकाशी यांनी जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.या शाळेच्या दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान जरी जमा झाले असले तरी त्यामध्ये वर्गखोल्यांचे पत्रेदेखील येणार नाहीत. तसेच या रकमेत दुरुस्ती होऊ शकत नसल्याने नवीन वर्गखोल्या बांधून मिळाव्यात, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत. याचदरम्यान शाळेच्या वरील कमान भिंत पत्र्यावर पडून ही दुर्घटना घडल्याचे शाळा समितीचे रामभाऊ बोरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण