घोडेगावात परिचारिकांचा स्टुडंट फेडरेशनकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST2021-05-13T04:12:18+5:302021-05-13T04:12:18+5:30

प्रारंभी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा काळे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा, पुस्तक व पुष्पगुच्छ ...

Student Federation felicitates nurses in Ghodegaon | घोडेगावात परिचारिकांचा स्टुडंट फेडरेशनकडून सत्कार

घोडेगावात परिचारिकांचा स्टुडंट फेडरेशनकडून सत्कार

प्रारंभी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा काळे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी एसएफआय संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, समीर गारे, राजू घोडेे, अनिल सुपे, अर्चना गवारी इत्यादी उपस्थित होते. ज्योती वाळुंज या आपल्या कामाच्या कक्षेपेक्षा मनोभावे रुग्णांची सेवा करतात. अनेक शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे, त्यांच्या या कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे किसान सभेचे अमोल वाघमारे यांनी सांगितले.

--

फोटो १२ घोडेगाव परिचारिका सत्कार

फोटो खालच्या ओळी -

परिचारिका दिनानिमित्त घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका ज्योती वाळुंज यांचा सत्कार करताना डाॅ. सुवर्णा काळे.

Web Title: Student Federation felicitates nurses in Ghodegaon