शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हरिपाठ करत नाही म्हणून वारकरी संस्थेत विद्यार्थ्याला मारहाण ; प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 21:34 IST

 वारकरी शिक्षण घेण्यासाठी मावळातून आलेल्या अकरा वर्षांच्या वारकरी विद्यार्थ्यांला शिक्षक महाराजांनी बेदम मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. विद्यार्थ्याला  जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : वारकरी शिक्षण घेण्यासाठी मावळातून आलेल्या अकरा वर्षांच्या वारकरी विद्यार्थ्यांला शिक्षक महाराजांनी बेदम मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. विद्यार्थ्याला  जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान पोहणे असे या महाराजांचे नाव आहे. त्याला त्याचे मूळ गाव ओझर (ता. जिंतूर, जि. परभणी) येथून अटक करण्यात आली आहे. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली असून याप्रकरणी कविता राजू चौधरी (वय-२८, रा. आंबी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. ओम राजू चौधरी असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. या मुलाला आठ दिवसांपासून दवाखान्यामध्ये उपचारासाठी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पिंपरीतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असून ओमची तब्येत गंभीर आहे. वडील नसल्याने मुलाच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. आळंदीत अभ्यासाला टाकायचं म्हणून निर्णय घेतला आणि एक वर्षांपासून मुलगा आळंदीत आरोपी पाहुण्यांकडे माऊली ज्ञानराज प्रसाद आध्यात्मिक शिक्षण संस्थेत राहून शिकत होता. दरम्यान अचानक राजूच्या आईला फोन आला की तुमच्या मुलाला उलटी, जुलाब होत आहेत; तुम्ही त्याला इथून घेऊन जावा. त्यामुळे ओमला घेऊन जायला त्याचा मामा आणि आई आठ दिवसांपूर्वी आळंदीत आले. त्या वेळेस राजू बेशुद्ध अवस्थेत होता.

त्याला आनंद हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे उपचारासाठी दाखल केले. दोन-तीन दिवसांनी तो बोलू लागला. मग त्याला विचारलं, काय झालं बाळा, तुला काय झाले? या वेळी त्याने  महाराजांनी हात-पाय बांधून मारल्याचे सांगितले. ओमच्या अंगावर मारण्याचे व्रण दिसत होते. यानंतर आळंदी पोलिसांत तक्रार देण्यात आली. याबाबत आळंदी पोलिसांनी सांगितले की, राजू हा हरिपाठ व अभ्यास करत नाही म्हणून आरोपी पाहुणे याने त्याला काठीने छातीवर आणि हातापायांवर मारहाण केली. यात ओम हा गंभीर जखमी झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAlandiआळंदीStudentविद्यार्थीTeacherशिक्षक