शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्न, सहली, यात्रांवर 'एसटी 'ची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 21:17 IST

एसटी महामंडळाचा महसुलाचा प्रमुख स्त्रोत तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न आहे.

ठळक मुद्देकाही वर्षांपर्यंत लग्नकार्य, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रामुख्याने एसटी बसला प्राधान्य विभागीय पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणुक केली जाणार

पुणे : उत्पन्न वाढीसाठी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाबरोबरच लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहली या करीता प्रासंगिक करारावर एसटी महामंडळाकडून अधिक भर दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागीय पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणुक केली जाणार आहे. तसेच प्रत्येक आगाराला प्रासंगिक कराराचे उद्दिष्ट निश्चित करून दिले जाणार आहे. एसटी महामंडळाचा महसुलाचा प्रमुख स्त्रोत तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न आहे. पण त्याचबरोबर प्रासंगिक करार, जाहिराती, गाळे भाडेतत्वावर देणे अशा विविध मागार्नेही महसुल मिळतो. मागील काही वर्षांपर्यंत लग्नकार्य, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रामुख्याने एसटी बसला प्राधान्य दिले जात होते. यातून एसटीला मोठा महसुल मिळायचा. पण आता त्यामध्ये घट झाल्याचे चित्र आहे. यापार्श्वभुमीवर एसटीने पुन्हा प्रासंगिक करारावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात येत असून विभागीय पातळीवरील अधिकारी, पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच लवकरच आगारनिहाय प्रसंगिक कराराचे उद्दीष्ठे ठरवून दिली जातील. ती उद्दीष्ठे साध्य करण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.विभागीय स्तरावर मागील आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊन ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी प्रासंगिक करारावर एसटी बस घेतली होती, अशा संस्थांशी संपर्क साधून शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शैक्षणिक  संस्थांनी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खासगी बसेस वापरल्या असतील अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस घेण्याबाबत त्यांना विनंती करावी, आदी सूचना एसटी प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत. प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही बस मार्ग बंद राहणार नाहीत  किंवा  कामासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही कळविण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.-----------

 

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सmarriageलग्नtourismपर्यटन