शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : दीपक म्हैसेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 20:33 IST

काही दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांच्या (प्रखर विद्युत झोत असलेले दिवे) खांबाचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकामातील कुचराईमुळे दुर्घटना घडल्यास गुन्हा दाखल करणार 

पुणे : काही दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांच्या (प्रखर विद्युत झोत असलेले दिवे) खांबाचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. या खाबांच्या मजबुतीची चाचणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करावी आणि कमकुवत खांबांची तातडीनी दुरुस्ती करावी असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. तसेच, या कामात कुचराईमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामांची आणि मुक्कामांच्या ठिकाणांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली. अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील दौंड तालुक्यातील वरवंड पालखी तळाला म्हैसेकर यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पालखी तळावर उभारण्यात आलेले हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात कोसळल्याचे सांगितले. त्याची दखल घेत, म्हैसेकर यांनी हायमास्ट दिव्यांच्या पायाची पाहणी केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील तळावर उभारण्यात आलेल्या सर्वच दिव्यांच्या खांबाची मजबुती तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. हायमास्ट दिवे योग्यरित्या उभारणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची दिव्यांची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. तीर्थ क्षेत्र व विकास निधीतून नीरा नरसिंहपूर येथील देवस्थानाच्या विकासकामांनाही म्हैसेकर यांनी भेट दिली. कामाचा दर्जा राखत, जलदगतीने काम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊस