शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सायबर पोलिसांची दमदार कामगिरी, सहा महिन्यात फसवणुकीतील ७ कोटी ८७ लाख रुपये रिफंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 13:04 IST

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ..

ठळक मुद्देसायबर पोलिसांमुळे ५३१ जणांना मिळाला दिलासा

विवेक भुसे

पुणे : वेगवेगळी कारणे सांगून लोकांच्या माहितीच्या अभावाचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे लोकांना लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. त्याचवेळी या सायबर चोरट्यांनी चोरलेला पैसे परत मिळवून देण्याचे कामही सायबर पोलीस ठाण्याकडून होताना दिसत आहे. गेल्या ६ महिन्या सायबर पोलिसांनी ५३१ जणांचे ७ कोटी ८७ लाख ८४ हजार ७४९ रुपये परत मिळवून दिले आहेत. 

अनेकदा आपण गोपनीय क्रमांक शेअर केला नसतानाही सायबर चोरटे आपल्या बँक खात्यावर डल्ला मारुन त्यातील रक्कम आॅनलाईन ट्रान्सफर करतात. अशावेळी आपण तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास संबंधित बँकेला सायबर पोलीस याची माहिती कळवितात. ज्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ते खाते गोठविण्यास सांगितले जाते. त्यानंतर बँक ठराविक दिवसानंतर फसवणुक झालेल्या खातेदाराला त्याचे पैसे परत करते. जर खातेदाराने आपला ओटीपी शेअर केला असेल तर अशा फसवणुकीतील रक्कम बँक परत करत नाही. सायबर चोरटे हे प्रामुख्याने आॅनलाईन ट्रान्सफर केलेले पैसे एखाद्या वॉलेटमध्ये पाठवितात. अशावेळी सायबर पोलीस संबंधित वॉलेटच्या कंपनीशी तातडीने पत्रव्यवहार करुन संबंधितांना त्यांची फसवणुक झालेली रक्कम परत मिळवून देते. 

डेबिड, क्रेडिक कार्डमार्फत फसवणुक झालेल्या तक्रारीत ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ४०७ रुपये सायबर पोलिसांनी लोकांना परत मिळवून दिले. डेबिट, क्रेडिट कार्डशिवाय पैसे ट्रान्सफर झालेल्या तक्रारीत १ कोटी १७ लाख ७७ हजार ३५३ रुपये बँक खातेदारांना परत करण्यात आले.

नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांची फसवणूक केली जाते. अशा फसवणूक झालेल्या १८९ तक्रारींपैकी बहुतांश तरुणांना ५५ लाख ९४ हजार ६९६ रुपये परत करण्यात आले आहेत.

आपण सायबर चोरट्यांना ओटीपी नंबर शेअर केला असेल तर त्या व्यवहाराची बँक जबाबदारी घेत नाही. त्यामुळे कधीही कोणाला गोपनीय क्रमांक शेअर करुन नका. सायबर चोरट्यांपासून सावध रहा. तरीही यदा कदाचित तुमची फसवणूक झाली तर तातडीने सायबर पोलिसांशी आणि बँकेशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

़़़़़़़़़़़़़

रिफंड

डेबिड, क्रेडिट कार्डच्या फसवणुक ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ४०७

कार्डशिवायच्या व्यवहारातील फसवणुक १ कोटी १७ लाख ७७ हजार ३५३

नोकरीच्या आमिषाने फसवणूक ५५ लाख ९४ हजार ६९६

एकूण रिफंड ७ कोटी ८७ लाख ८४ हजार ७४९

…...........

८० लाख २४ तासात परत

एका सरकारी कंत्राटदाराने पहाटेच सायबर पोलिसांकडे संपर्क साधून आपल्या खात्यातून ८० लाख रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली. त्याच्या खात्यातून पैसे कोठे ट्रान्सफर झाले, याची माहिती घेतल्यावर ते पैसे देना बँकेच्या जयपूर येथील खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. सायबर पोलिसांनी तातडीने या बँकेला सकाळीच ई मेल करुन ते पैसे गोठविण्यास सांगितले व ते परत संबंधितांच्या खात्यात परत करण्यास सांगितले़ पोलिसांच्या पत्रावरुन बँकेने हे पैसे तातडीने परत त्या कंत्राटदाराच्या खात्यात परत केले. याचप्रमाणे कॉसमॉस बँकेवर सायबर दरोडा घालण्यात आला होता.त्यातील १३ कोटी ९२ लाख रुपये हॅनसँग बँकेत हस्तांतरीत झाले होते.सायबर पोलिसांनी हे पैसे गोठविण्यास बँकेला कळविले होते व हाँगकाँग पोलिसांनाही कळविले होते. हॅनसँग बँकेने ते पैसे गोठविले. त्यानंतर कॉसमॉस बँकेने येथील न्यायालयात दावा केल्यावर हे पैसे कॉसमॉस बँकेला परत मिळाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम