रेटवडी-पिंपळगाव गटात धक्कादायक निकाल

By Admin | Updated: February 24, 2017 02:13 IST2017-02-24T02:13:50+5:302017-02-24T02:13:50+5:30

रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटात धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

Striking results in the Rewati-Pimpalgaon group | रेटवडी-पिंपळगाव गटात धक्कादायक निकाल

रेटवडी-पिंपळगाव गटात धक्कादायक निकाल

दावडी : रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटात धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे या गटात विजयी होऊन माजी पंचायत समिती उपसभापती राजू जवळेकर यांचे पूर्व भागातील वर्चस्व संपुष्टात आले आहे.
रेटवडी-पिंपळगाव गटामध्ये मोठी चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार निर्मला सुखदेव पानसरे व शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा मिसाळ/जवळेकर यांच्यात लढत झाली. पानसरे यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. तसेच याच गटातील दावडी गणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वैशाली गव्हाणे यांनी विजय मिळवला, तर रेटवडी गणातील शिवसेनेच्या उमेदवार सुभद्रा शिंदे या विजयी झाल्या आहेत. खेडचा पूर्व भागात राजू जवळेकर यांचा बालेकिल्ला होता.
मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीला कॉँग्रेस पक्षातून निवडून आले होते. तसेच त्यांनी दोन पंचवार्षिक निवडणुकीत दोन उमेदवार जिल्हा परिषदेवर निवडून पाठविले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजू जवळेकर हे काँग्रेस पक्षातून शिवसेना या पक्षात गेले होते. त्यांनी पूर्व भागात शिवसेनेचा भगवा फडकावयचा प्रयत्न केला मात्र. या निवडणुकीत जवळेकर यांनी त्यांच्या भगिनी सुवर्णा मिसाळ यांचा शिवसेनत प्रवेश करून उमेदवारी दिली. विरोधी पक्षांनी बाहेरील उमेदवार म्हणून टीका केली. पानसरे यांना १५४७६ मते मिळाली, तर मिसाळ यांना १०९९० मते मिळाली.
पानसरे निवडून आल्यामुळे जवळेकर यांचे या भागात वर्चस्व कमी झाले असल्याचे चित्र दिसत आहे. दावडी गणामध्ये राष्ट्रवादीचे कट्टर व माजी आमदार दिलीप मोहिते यांचे समर्थक, दावडी गावचे माजी सरपंच संतोष गव्हाणे यांच्या पत्नी वैशाली गव्हाणे यांनी शिवसेनेच्या उमेदवार छाया होरे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे या भागात माजी आमदार दिलीप मोहितेसमर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रेटवडी गणात शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांनी ६६८८ मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवार बिजली भालेकर यांचा पराभव केला आहे.

बुचके यांचा चौथ्यांदा विजय

नारायणगाव : नारायणगाव-वारुळवाडी गट व गणातून शिवसेनेचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याने या गटातील शिवसैनिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या आशाताई बुचके, पंचायत समितीच्या नारायणगाव गणातून अर्चना माळवदकर व वारुळवाडी पंचायत समिती गणातून रमेश खुडे हे तिन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. नारायणगाव गटातून झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आशाताई बुचके यांना १२ हजार ६९८ विजयी मते मिळाली. राष्ट्रवादीच्या राजश्रीताई बोरकर यांना ८ हजार ७१२ मते, अपक्ष उमदेवार सोनाली मकरंद पाटे ३ हजार ५७ मते व भाजपाच्या मनीषा पारेकर यांना ५५८, नोटा ३६५, अवैध १ मत, २५ हजार ३९० वैध ठरली. या गटात एकूण ३७ हजार ७४० मतदार होते, तर नारायणगाव पंचायत समिती या गणात १२ हजार ४३० मतदान वैध ठरले. शिवसेनेच्या अर्चना माळवदकर यांना ६ हजार ४९६ विजयी मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या प्रीती राजेश कोल्हे यांना ५ हजार ४९८ मते व नोटा ४३६ मते मिळाली. वारुळवाडी पंचायत समिती गणात शिवसेनेचे रमेश खुडे यांना ६ हजार ४१४ विजयी मते, राष्ट्रवादीचे सुशील सोनवणे यांना ४ हजार ६४५, भाजपाचे अभय वाव्हळ यांना ४९४, किरण पाटोळे २०१, विशाल रणदिवे ९६८, नोटा २३७, अवैध २. १२ हजार ९५९ मते वैध ठरली. विजयानंतर आशाताई बुचके म्हणाल्या, हा विजय केलेली विकासकामे व शिवसैनिकांच्या मेहनतीवर संपादन केला आहे.

Web Title: Striking results in the Rewati-Pimpalgaon group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.