शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

माथेफिरुने पळवली एसटी, ४ वाहनांना दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 23:48 IST

भिगवण आगारातील थरार : ४ वाहनांना दिली धडक; नागरिकांनी अनुभवली पुण्यातील सात वर्षांपूर्वीची घटना

भिगवण : येथील आगारात भिगवण-बारामती एसटी बस (एमएच १४-बीटी २९५६) थांबली असताना अचानक एका माथेफिरूने तिचा ताबा घेऊन ती आगारातून पळवून नेली. एसटी सोलापूरच्या दिशेने सर्व्हिस रोडने नेऊन चार वाहनांना धडक दिली. यात वाहनांचा चक्काचूर झाला. यानंतर एसटी सोनाज पंपाशेजारील गटाराच्या ड्रेनेजमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी अथवा जखमी झाले नाही. मात्र, या घटनेमुळे ७ वर्षांपूर्वी पुण्यात संतोष माने याने पळवलेल्या एसटीच्या घटनेची आठवण भिगवणकरांना झाली.

भिगवण येथील आगारात भिगवण-बारामती एसटी सहाच्या सुमारास आली. या वेळी चालक एस. आर. सोनवणे आणि वाहक शिवाजी गावडे आगार कार्यालयात गेले. या वेळी माथेफिरू बालाजी गोपाळ रेणके (रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) याने एसटीत प्रवेश करून एसटी पळवली. ही बस भिगवणकडून सोलापूरच्या दिशेने सर्व्हिस रस्त्याने वेगाने नेऊन महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या पेट्रोलियम गाडीला (एम ४२ एक्यू १६२८) भिगवण पुलाखाली जोरदार धडक दिली. या वेळी त्याने गाडी न थांबवता ती पुढे दामटत या ट्रकपुढे असणाऱ्या तीन वाहनांना धडक दिली. या वेळी पाईप घेऊन चाललेल्या पिकअपला (एमएच ०५-आर ५६२७) बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे बस रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या ड्रेनेजमध्ये अडकली. यामुळे मोठा अनर्थ टळला.भरगर्दीच्या वेळी सायंकाळी एसटी आगारातून पळवून नेल्याने भिगवण आगारात मोठी खळबळ उडाली होती. चालक आणि वाहक एसटीमागे सुमारे अर्धा किलोमीटर पाठलागकरीत पळाले.महाराष्ट्र सुरक्षा बलाचाकर्मचारी अशोक नागरगोजे याने पळविलेल्या गाडीचा पाठलाग करून बस ओव्हरटेक करून रस्त्यावर असणाºया नागरिकांना आपल्या शिट्टीने सावध करीत बाजूला केले. त्यामुळे जीवितहानी होण्यापासून वाचली...तर घडली असती भीषण घटनाभिगवणकरांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे या माथेफिरूने गाडी सर्व्हिस रस्त्याच्या विरुद्ध बाजूने नेली. ही गाडी जर पुणे बाजूने सोलापूर बाजूला असणाºया मार्गाने नेली असती, तर मोठे अपघात झाले असते.अपघाताची माहिती मिळताच तातडीने भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह पोलीस गोरख पवार, श्रीरंग शिंदे, सचिन जगताप व एसटी डेपोतील पथकाने तत्काळ अपघातस्थळी येऊन माथेफिरूला ताब्यात घेतले. 

टॅग्स :Puneपुणे