शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत करवसुलीसाठी धडक कारवाई; १४ मालमत्ता सील तर ४८ नळ कनेक्शन कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 18:52 IST

नागरिकांनी वेळेत आपला कर भरून दंडात्मक व्याज आकारणी आणि कटू कारवाई टाळावी असे आळंदी नगरपरिषदेचे आवाहन

आळंदी : आळंदी नगरपरिषद मार्फत गेल्या चार महिन्यांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून आर्थिक वर्ष संपत आल्याने मागील दहा दिवसात ही कर वसुली मोहीम नगरपरिषद मार्फत तीव्र स्वरूपात करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण १४ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ४८ नळ कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.                   आर्थिक वर्ष २०२३ - २४ मध्ये एकूण ७.५० कोटी (७०%) मालमत्ता कर आणि ५० लाख (३०%) पाणीपट्टी वसुली झाली असून उर्वरित थकीत कर वसुलीसाठी आळंदी नगरपरिषद मार्फत धडक कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे. या धडक कारवाईत आळंदी नगरपरिषदेचा संपूर्ण अधिकारी, कर्मचारी वर्ग सहभागी असून वारंवार गृहभेटी देऊन कर भरण्याचे आवाहन करून देखील प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे.           शासनाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना केवळ नवीन कामांसाठी निधी प्राप्त होतो. देखभाल दुरुस्ती करिता कुठलाही निधी नगरपरिषदांना प्राप्त होत नसून तो नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या स्वनिधितून करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांनी देखील आपला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. मार्च महिना संपला म्हणून कर वसुली मोहीम थांबणार नसून थकबाकीदारांवर कारवाई सुरूच राहणार आहे. 

येत्या २०२४ - २५ या आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून वर्षभर ही कर वसुली मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. नागरिकांनी वेळेत आपला कर भरून दंडात्मक व्याज आकारणी आणि कटू कारवाई टाळावी असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandi Nagar Parishadआळंदी नगर परिषदGovernmentसरकारTaxकरMONEYपैसा