पुणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काळेपडळ पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत लॉज आणि हॉटेल मालक/चालकी यांच्यासाठी एक नियमावली तयार केली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून लॉज आणि हॉटेल मालक/चालकांना बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.
पुणेपोलिसांच्या परिमंडळ ५ कडून हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पोलिसांनी लॉज मालक चालकांसोबत चर्चा केली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
बैठकीत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे
१. लॉज येथे रहावयास येणारे सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरला नोंद घ्यावी. २. लॉज येथे राहावयास येणारे परदेशीय नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी. ३. लॉज मधील सर्व कामगार वर्ग यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. ४. लॉज येथे बालकामगार कामावर ठेवू नयेत.५. लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत. ६. लॉज येथे आग लागली असता तात्काळ आग विझविणे करिता फायर फायटर साहित्य लावण्यात यावेत. ७. लॉज येथील दर्शनी भिंतीवर आपत्कालीन नंबर लावण्यात यावेत. ८. लॉज समोर वाहने पार्किंग होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.९. लॉज च्या ठिकाणी संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूम 112 तसेच काळेपडळ पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.