बारामतीत आजपासून कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST2021-05-06T04:10:23+5:302021-05-06T04:10:23+5:30

विनाकारण फिरणारी ३० वाहने जप्त, दोन दुकाने सील बारामती : बारामतीत बुधवारी (दि. ५) मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाऊनला ...

Strict from today in Baramati | बारामतीत आजपासून कडक

बारामतीत आजपासून कडक

विनाकारण फिरणारी ३०

वाहने जप्त, दोन दुकाने सील

बारामती : बारामतीत बुधवारी (दि. ५) मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. नागरिकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याने बारामती निर्मनुष्य झाल्याचे पहावयास मिळाले. पोलिसांनी शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. पोलिसांनी आज विनाकारण फिरणारी ३० वाहने जप्त केली. तसेच दोन दुकाने सील केली आहेत.

शहरात १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ अधिकारी व १२० कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तुकडीसह ४० गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त केले आहेत. बारामती शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. सर्वच रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आज विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३० वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एका वाईन शॉपसह किराणा दुकान सील करण्यात आले आहे. काही मेडिकल दुकाने औषधांच्या नावाखाली बिस्कीट, चिप्स आदी सहित्य विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दुकानांनी केवळ औषधांची विक्री करावी. औषधांच्या नावाखाली इतर विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिला आहे.

————————————————————

Web Title: Strict from today in Baramati