बेल्ह्यात लॉकडाऊनचे काटेकोर पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:21+5:302021-04-11T04:10:21+5:30
आज सकाळपासून एकही दुकान उघडले नाही. गावातील दवाखाने व मेडिकल दुकाने चालू होते. रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. पोलिसांचे वाहन ...

बेल्ह्यात लॉकडाऊनचे काटेकोर पालन
आज सकाळपासून एकही दुकान उघडले नाही. गावातील दवाखाने व मेडिकल दुकाने चालू होते. रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. पोलिसांचे वाहन वेळोवेळी गावातून गाडीवरून ध्वनिक्षेपकावरून लाॅकडाऊनबाबत कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत होते.
या मिनी लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील व्यवहारात थंडावले आहेत. या मिनी लाॅकडाऊनला शेतकरी, व्यापारी व छोटे छोटे दुकानदार त्रासले आहेत. गेली वर्षभर बंद-चालू आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पोलीस पाटील गावात फिरुन लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करीत आहेत. एस. टी. बसेस तुरळक प्रमाणात रस्त्यावर दिसत होत्या. ग्रामीण भागातील अर्थचक्र पूर्णपणे थांबले.
--
फोटो क्रमांक: ०४बेल्हा लॉकडाऊन काटेकोर पालन
फोटो ओळी : लॉकडाऊनचे नागरिकांनी काटेकोर पालन केल्याने बेल्ह्यातील रस्त्यावर असा शुकशुकाट होता.