दोन गटांत हाणामारीने तणाव
By Admin | Updated: July 8, 2015 03:05 IST2015-07-08T03:05:26+5:302015-07-08T03:05:26+5:30
पर्वतीदर्शन परिसरात दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला होता. जमावाने परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

दोन गटांत हाणामारीने तणाव
पुणे : पर्वतीदर्शन परिसरात दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला होता. जमावाने परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. सुमारे दीड तास हा तोडफोड आणि दगडफेकीचा प्रकार सुरू होता. एकावर वारही करण्यात आले. यामध्ये ७ ते ८ जण जखमीही झाले. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला. पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, पोलीसांकडून याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.
मंगळवारी सायंकाळी पर्वतीदर्शन परिसरात दोन गटांत किरकोळ कारणांवरून वादावादी झाली. त्याचे पर्यवसन दगडफेकीत झाले. या वादावादीतून माजी नगरसेवक बाळासाहेब भामरे यांचा मुलगा तुषार भामरे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. दोन्ही बाजूंकडील गटांकडून परिसरात रस्त्यांवर लावलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात येत होती. परिसरातील काही रिक्षांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला. अनेक मोटारींची तोडफोड करण्यात आली.