थेऊर येथे ताणतणाव व्यवस्थापन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:50+5:302021-08-28T04:14:50+5:30
सध्याच्या या धावपळीच्या काळात व कोरोनाच्या सावटाखाली सर्वच जण विविध आजारांना बळी पडत असून, या होणाऱ्या विविध आजारांना ताणतणाव ...

थेऊर येथे ताणतणाव व्यवस्थापन शिबिर
सध्याच्या या धावपळीच्या काळात व कोरोनाच्या सावटाखाली सर्वच जण विविध आजारांना बळी पडत असून, या होणाऱ्या विविध आजारांना ताणतणाव देखील तेवढाच कारणीभूत असून, या ताणतणावाचे व्यवस्थापन करून पुढील आयुष्य कशाप्रकारे आनंदित जगता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. समाजोपयोगी असणारी ही संस्था विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मोलाची मदत करताना दिसत असते. विद्यार्थ्यांना दप्तरेवाटप, वह्यावाटप व विविध उपक्रम ही संस्था राबवत असते.या कार्यक्रमाच्या मार्गदर्शकाची भूमिका हरीष वैद्य, नागसेन खडसे,सुप्रिया नलवडे,श्रुती अवटे,धर्मेंद्र पडवळकर यांनी पार पाडली.
कार्यक्रमास थेऊर, कुंजीर वस्ती, वाघोलेवस्ती येथील शाळांमधील सर्व शिक्षक तसेच थेऊर गावातील अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकांत आगळे यांनी केले. त्याचसोबत जि. प शाळा थेऊरचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर व रहिमान शेख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
270821\screenshot_20210827-165708_whatsapp.jpg~270821\screenshot_20210827-165715_whatsapp.jpg
शिबिरामध्ये उपक्रमात सहभागी झालेले शिक्षक~उपस्थित मान्यवरांचा सत्कार करताना