पोटच्या मुलांप्रमाणे वृक्षांचे संवर्धन करा

By Admin | Updated: July 3, 2017 02:09 IST2017-07-03T02:09:20+5:302017-07-03T02:09:20+5:30

आदिवासी बांधवांनो, आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे लावलेल्या वृक्षांचे संगोपन करा. वृक्ष हीच आपली खरी संपत्ती आहे व तिची वाढ व

Strengthen the tree as the children of the stomach | पोटच्या मुलांप्रमाणे वृक्षांचे संवर्धन करा

पोटच्या मुलांप्रमाणे वृक्षांचे संवर्धन करा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : आदिवासी बांधवांनो, आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे लावलेल्या वृक्षांचे संगोपन करा. वृक्ष हीच आपली खरी संपत्ती आहे व तिची वाढ व संगोपन करणे हीच खरी आपली नैतिक जबाबदारी आहे, असा सल्ला माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे यांनी दिला.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे महाराष्ट्र शासनाने राज्यात १ ते ७ जुलै या सात दिवसांमध्ये वनमहोत्सव अंतर्गत श्रमदानाद्वारे ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानिमित्त वनविभाग जुन्नर वनपरिक्षेत्र घोडेगाव व वनपरिमंडल अंतर्गत तळेघर येथे ११ हजार वृक्ष लागवडीच्या उद्घाटनप्रसंगी सुभाषराव मोरमारे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आजपर्यंत आपल्या आदिवासी बांधवांनी जंगल राखले आहे. आपणच वनांचे रक्षक असून, येथून पुढेही आपल्या कुटुंबांचा एक भाग म्हणून वृक्षांचे संगोपन करा. आपल्या मुलांप्रमाणे त्यांना जीव लावून वाढवा. वृक्ष-वेली हीच आपल्या आदिवासी बांधवांची खरी संपत्ती आहे.
या वेळी समाजकल्याणचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, जिल्हा परिषद माजी सदस्य विजय आढारी, जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन,
पंचायत समिती माजी उपसभापती सलीम तांबोळी, वनसंरक्षण समिती अध्यक्ष सखाराम मोहंडुळे, वनपाल एस. बी. मुलाणी, यशराज काळे, वनपाल बी. एम. साबळे, वनरक्षक अचल गवळी, के. बी. लोखंडे, डी. एम. मोरे, संपत तांदळे, डी. आर. साबळे, व्ही. के. भोते उपस्थित होते.

Web Title: Strengthen the tree as the children of the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.