शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 5, 2021 12:51 IST

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता..

पुणे : सर्वत्र लग्नाचा हंगाम सुरु आहे. यामध्ये प्रत्येकाचा आपले लग्न चर्चेचा विषय कसा ठरेल यासाठी धडपड सुरु असते. त्यात मग 'हटके' फंडे वापरल्याने काही लग्नांची तुफान चर्चा देखील सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते. पण पुण्यात एक लग्न खास आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरले. या नयनरम्य विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध राजकीय नेतेमंडळींसह अनेकांनी दिग्गजांनी हजेरी लावत वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. हा लग्न सोहळा विशेष आकर्षण यासाठी होता की आपल्याच गुरूचा जावई होण्याचा मान एका शिष्याने मिळवला आहे.  

कुस्तीचे मैदान मारण्यासाठी एकाहून एक सरस कुस्तीपटू तयार करणाऱ्या काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्त झालेल्या राहुल आवारे यांचा गेल्या ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता. पुण्यात रविवारी ( दि. ३ )  या जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. साखरपुडा झाल्यापासूनच हे राहुल आणि ऐश्वर्या जोडपे हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.  

कुस्तीच्या खेळातून भारताचा डंका साता समुद्रापार वाजवताना ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केलेला राहुल आवारे हा पाटोद्याच्या बाळासाहेब आवारे यांचा सुपुत्र व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा शिष्य आहे. या कामगिरीनंतर राहुलची गृह विभागाने थेट डीवायएसपी या पदावर नियुक्ती केली आहे. राहुल आणि ऐश्वर्या हे रविवारी मोठ्या धुमधडाक्यात पुण्यात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात एकमेकांचे आयुष्यभरासाठी साथीदार झाले. या निमित्ताने आपल्याच गुरूचा 'जावई' होण्याचा मान राहुल याला मिळाला. 

तापट मुलगा ते उत्तम कुस्तीपटू असा राहुलचा थक्क करणारा प्रवास.... बीड जिल्ह्यातील पाटोद्याच्या राहुल आवारेने जागतिक पातळीवर कुस्ती स्पर्धेत देशाचे नाव लौकिक करताना आपली दैदिप्यमान कारकीर्द घडविली आहे. परंतू, बालपणी तो उनाडक्या करणारा आणि दंगाखोर होता. त्याच्या तापट स्वभावामुळे वडील बाळासाहेब यांनी त्याला कुस्तीकडे वळविले. एक तापट मुलगा ते उत्तम कुस्तीपटू आणि नंतर डीवायएसपी असा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. आतापर्यंत राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर २००९ व २०११ च्या आशियाई स्पर्धेत तो ब्राँझ पदकाचा मानकरी ठरला. राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पाचवेळा सुवर्णपदक जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाइल खेळणाऱ्या राहुलने मराठी पताका फडकविली.

 

टॅग्स :PuneपुणेRahul Awareराहुल आवारेPoliceपोलिसWrestlingकुस्तीmarriageलग्नSharad Pawarशरद पवार