गोमांस, गोवंश वाहतूक विक्रीचे प्रकार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:09+5:302021-07-07T04:12:09+5:30
आंबेगाव तालुक्यात प्राणी संरक्षण अधिनियम, गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत असून कसाई व दलाल यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. ...

गोमांस, गोवंश वाहतूक विक्रीचे प्रकार थांबवा
आंबेगाव तालुक्यात प्राणी संरक्षण अधिनियम, गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत असून कसाई व दलाल यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. नुकतीच भोसरी या ठिकाणी गाभण गोमातेची विटंबना व हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या घटनेचा तीव्र निषेध व कडक कारवाई व्हावी, तसेच प्राणी संरक्षण अधिनियम, गोहत्या बंदी कायद्याचे नियमन व्हावे, यासाठी बजरंग दल जिल्हा संयोजक संतोष खामकर, घोडेगाव प्रखंड मंत्री सागर काळे, प्रखंड संयोजक विवेक दौंड, गोरक्षक, पदाधिकारी व सर्व बजरंगी यांच्या हस्ते लहू थाटे यांना निवेदन देण्यात आले.
घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना निवेदन देताना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते.