शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी अगोदरच दिवाळे निघेल; खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी सर्वसामान्यांची लूट थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 17:09 IST

युवक काँग्रेसच्या वतीने आरटीओ अधिकाऱ्यांकडे मागणी ; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे : खासगी वाहतूक बस, ट्रॅव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना बेकायदा तिकिट आकारणी विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. प्रदेश युवककाँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या महासचिव वैष्णवी किराड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन, आनंद दुबे, पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे सरचिटणीस पूनमित तिवारी, पुणे सरचिटणीस हृषीकेश सणस, पर्वती विधानसभा अध्यक्ष केतन जाधव यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत बोलताना प्रथमेश आबनावे म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने पुण्यातून बाहेरगावी खासगी बस आणि ट्रॅव्हल्स तर्फे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात विद्यार्थी आणि नोकरदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.सणाच्या तोंडावर केलेली ही भरमसाठ भाडेवाढ यामुळे दिवाळी साजरी करण्याआधीच दिवाळे निघेल, अशी परिस्थिती आहे. अशाने अराजकता माजेल. तसेच खासगी वाहने आणि ट्रॅव्हल्ससाठी भाडे निश्चिती मोटार अॅक्टनुसार करण्यात आली असून, ती एसटी भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक आहे. म्हणजेच एसटीचे भाडे २०० असेल, तर खाजगीबस चालकांना तीनशे रुपये तिकीट घेता येते. त्यामुळे वेळीच प्रशासनाने यात लक्ष घालावे आणि अकारण भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रशासनाने संबंधितांवर योग्य वेळेत कारवाई केली नाही तर १८ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही आबनावे यांनी दिला.

युवक काँग्रेसच्या मागण्या..

- ज्यादा भाडे आकारणी करणाऱ्या बस चालकांची नोंदणी रद्द करा.- नियमानुसार भाडे आकारणी दरपत्रकाची जागृती करणारे फलक लावा.- तक्रार आल्यास शहानिशा करून प्रवाशाला २४ तासात न्याय द्या.- पथक तयार करून भाडे आकारणीतील अनियमितता तपासा.- अवास्तव भाडे आकारणाऱ्या बस, ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करा.

 

 

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनDiwaliदिवाळी 2022passengerप्रवासीMONEYपैसा