कॅन्टोन्मेंटमधील प्रवेश कर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:19 IST2017-08-04T03:19:54+5:302017-08-04T03:19:54+5:30

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत प्रवेश करणाºया वाहनांसाठी आकारण्यात येणारा प्रवेश कर तत्काळ बंद करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.

 Stop access to the Cantonment | कॅन्टोन्मेंटमधील प्रवेश कर थांबवा

कॅन्टोन्मेंटमधील प्रवेश कर थांबवा

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत प्रवेश करणाºया वाहनांसाठी आकारण्यात येणारा प्रवेश कर तत्काळ बंद करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.
देशात वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहनांकडून आकारला जाणारा प्रवेश कर सुमारे एक महिना बंद करण्यात आला होता. परंतु, केंद्र शासनाचे आदेश डावलून कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पुन्हा सुरू करण्यात आलेले बेकायदेशीर प्रवेश कर आकारणी तत्काळ थांबवावी, असे निवेदन शहर अध्यक्ष अजय शिंदे, विभाग अध्यक्ष संतोष मते, संतोष गायकवाड यांनी दिले आहे.

Web Title:  Stop access to the Cantonment